Three-Member Gang Arrested for Stealing Acid Cans Worth Lakhs from Chemical Warehouse!

पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.

Three-Member Gang Arrested for Stealing Acid Cans Worth Lakhs from Chemical Warehouse!
पुणे: केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिडचे कॅन चोरणारी टोळी गजाआडपुण्यातील धायरी परिसरातील एका केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ऑर्थो फॉस्फरिक ॲसिडचे १५४ कॅन चोरणाऱ्या तीन जणांच्या टोळीला नांदेड सिटी पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. नेमकी घटना काय?धायरी येथील एका केमिकल कंपनीच्या गोडावूनमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली होती. चोरट्यांनी कंपनीच्या गोडावूनमधून १५४ ऑर्थो फॉस्फरिक ॲसिडचे कॅन लंपास केले होते.

 

या घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांची धडाकेबाज कामगिरीगुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या तीन तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी या चोरीत सहभागी असलेल्या तीन संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरी केलेले सर्व ॲसिडचे कॅन आणि गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तपासादरम्यान संशयितांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले. नांदेड सिटी पोलिसांच्या या वेगवान कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *