नागपुर: मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी (१८ ऑगस्ट २०२६) ९:३० च्या रात्री उघडकीस आलेल्या एका घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलच्या एका खोलीत तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचा प्रकार समोर आला. या भीषण घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, तिच्यासोबत असलेला तरुण गंभीर जखमी अवस्थेत आहे. दोघांच्याही शरीरावर चाकूचे अनेक घाव असल्याने हा हत्येचा आणि आत्महत्येच्या प्रयत्नाचा गंभीर प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
रूम नंबर ३०२ मधील थरारक घटना: मनीषनगरातील अजित बेकरीमागे असलेल्या हॉटेल स्टेरियसमध्ये हा प्रकार घडला. मृत तरुणीचे नाव शिवानी राजानंद गजभिये (वय २८, रा. शताब्दी चौक, अजनी) असे असून ती रेल्वेमध्ये नोकरीला होती. तर गंभीर जखमी असलेल्या संशयिताचे नाव किरण संजय आत्राम (वय अंदाजे २८ ते ३०, रा. अजनी रेल्वे वसाहत) असे आहे. हे दोघे मंगळवारी हॉटेलमध्ये आले होते आणि त्यांनी रूम नंबर ३०२ भाड्याने घेतली होती.
रात्री साडे नऊच्या सुमारास अचानक या खोलीतून किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. आवाज ऐकून हॉटेल व्यवस्थापन आणि आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ तिकडे धाव घेतली. रूमचा दरवाजा उघडून आत पाहिले असता, हॉटेलमधील दृश्य अतिशय भयानक होते. खोलीतील बेड गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेला होता, परंतु संपूर्ण खोलीत रक्ताचा सडा पडला होता. शिवानी गजभिये मृतावस्थेत निपचित पडून होती, तर तिच्या शेजारीच किरण आत्राम गंभीर व रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता. त्यांच्याजवळच एक चाकूही पडून होता.
विवाह व संशयावरून वाद: प्राथमिक माहितीनुसार, मृत शिवानी आणि किरण दोघेही ओळखीचे असून रेल्वे विभागात संबंधीत आहेत. त्यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून लग्नावरून किंवा अन्य वैयक्तिक कारणांवरून वाद सुरू होता हा वाद मिटवण्यासाठी आणि काही वेळ एकत्र घालवण्यासाठी ते या हॉटेलमध्ये आले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. मात्र, हॉटेलच्या खोलीत पोहोचल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद विकोपाला गेला. संशयित किरणने सोबत आणलेल्या चाकूने शिवानीवर सपासप वार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवानीच्या मृतदेहाची भांग रक्ताने भरलेली आढळली आणि गळ्यात मंगळसूत्रही दिसून आले, ज्यावरून आरोपीने तिच्या मृत्यूनंतर तिच्या भांगेत कुंकवाऐवजी स्वतःचे रक्त भरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू: घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस ठाण्याचा ताफा तातडीने घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी शिवानीचा मृतदेह आणि गंभीर जखमी असलेल्या किरणला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी पाठवले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून शिवानीला मृत घोषित केले, तर किरणची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणामागील नेमके सत्य काय आहे, हे किरणची प्रकृती सुधारल्यानंतर त्याच्या चौकशीतून समोर येईल. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे सखोल तपास करत आहेत.
Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




