कोल्हापूर: जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक नांदणी मठाकडील महादेवी उर्फ 'माधुरी' या लाडक्या हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कायदेशीर बाबी, विविध प्रशासकीय समित्या आणि 'पेटा' (PETA) सारख्या प्राणिमित्र संस्थांच्या विरोधामुळे चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता माधुरीच्या परतीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, ती लवकरच पुन्हा आपल्या जुन्या आश्रयस्थानात म्हणजेच नांदणी मठात परतणार आहे. त्यामुळे नांदणीकर आणि कोल्हापूरवासियांमध्ये आनand आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नेमका वाद आणि कायदेशीर प्रवास काय होता? काही काळापूर्वी सुरक्षेचा आणि आरोग्याचा मुद्दा पुढे करत नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरात येथील 'वनतारा' (Vantara) पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले होते. मात्र, हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी मठाचे विश्वस्त, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांसोबतच राजकीय नेत्यांनी जोरदार पाठपुरावा सुरू केला होता. या प्रकरणी महाराष्ट्र शासन, वनविभाग आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्या प्रतिनिधींची एक उच्चस्तरीय संयुक्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने १७ जुलै रोजी नांदणी मठाला भेट देऊन तेथे हत्तीणीसाठी उभारण्यात आलेल्या सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली होती आणि १० ऑगस्ट रोजी उच्चस्तरीय समितीकडे आपला अहवाल सादर केला होता.
सुनावणी आणि विरोध: नुकताच या संपूर्ण प्रकरणावर उच्चस्तरीय समितीसमोर अंतिम ऑनलाइन सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान 'पेटा' या संस्थेने माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात पाठवू नये, अशी आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला. मात्र, मठाचे वकील ॲड. मनोज पाटील यांनी बाजू मांडताना स्पष्ट केले की, नांदणी येथे सध्या उभारण्यात आलेले सुविधा केंद्र तात्पुरत्या स्वरूपाचे असले तरी तिथे हत्तीणीसाठी सर्व आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच भविष्यात हत्तीणीसाठी आणखी एक अत्याधुनिक आणि प्रशस्त स्थायी स्वरूपाचे 'माधुरीवाडा' (हत्ती पुनर्वसन केंद्र) सहा एकर जागेत उभारण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्चस्तरीय समितीने आपला निकाल राखून ठेवला होता.
नांदणीकरांची प्रतीक्षा संपणार: सध्या 'वनतारा' येथे हत्तीणीची प्रकृती उत्तम असली तरी, भाविकांची श्रद्धा आणि मठाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तिला पुन्हा नांदणीत आणावे, ही ग्रामस्थांची आणि भक्तांची तीव्र इच्छा होती. आता सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि सुविधांची पूर्तता झाल्यामुळे माधुरीच्या घरवापसीचे मार्ग सुकर झाले आहेत. लवकरच माधुरी हत्तीण पुन्हा आपल्या लाडक्या नांदणी मठात दाखल होणार असून, तिच्या स्वागतासाठी मठात आणि परिसरात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




