नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीमध्ये १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 'कक्रोच जनता पार्टी'च्या (CJP) नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (DMRC) एक कठोर निर्देश दिला आहे. या निर्देशानुसार, आज रात्रीपासूनच शहरातील तब्बल ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग (Entry/Exit Gates) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आंदोलनाची पार्श्वभूमी व मुख्य मागण्या
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आणि निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) वादाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. सीजेपी (CJP) संघटनेने जंतरमंतरवर हे निदर्शने आंदोलन आयोजित केले असून, निवडणूक प्रक्रियेमध्ये तातडीने बदल करण्यात यावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, सुरक्षेचे कारण आणि मागील काही घटनांचा अनुभव लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. असे असतानाही मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
५७ मेट्रो स्थानकांवर निर्बंध व गाड्यांच्या फेऱ्या कमी होणार
दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीएमआरसीला पाठवलेल्या पत्रानुसार, संवेदनशील भागांमध्ये निदर्शकांची अनियंत्रित गर्दी रोखण्यासाठी शुक्रवार रात्री ९ वाजल्यापासून शनिवारपर्यंत परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत ५७ प्रमुख मेट्रो स्थानके बंद राहण्याची शक्यता आहे. यामध्ये राजीव चौक, सेंट्रल सेक्रेटरीट, पटेल चौक, जनपथ, नवी दिल्ली, मंडी हाउस, आयटीओ, सुप्रीम कोर्ट, कश्मीरे गेट, करोल बाग, आयएनए, हौज खास आणि लाजपत नगर यांसारख्या अत्यंत वर्दळीच्या स्थानकांचा समावेश आहे. तसेच, या स्थानकांवर येणाऱ्या मेट्रो गाड्यांची वारंवारता (Frequency) देखील कमी करण्याचे प्रस्ताव पोलिसांनी दिले आहेत.
रेल्वे प्रवाशांनाही मोठा फटका, हजारो गाड्या प्रभावित
या कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे आणि रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंदोलनाच्या पूर्वसंध्येलाच दिल्लीत वाहतूक कोंबी आणि निर्बंधांमुळे रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानक आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या रस्त्यांवर कडक सुरक्षा तपासणीमुळे हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, ५ हजारांहून अधिक प्रवाशांच्या ट्रेन या कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे चुकल्या आहेत, तर अनेक लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस गाड्या त्यांच्या मूळ स्थानकावरूनच रद्द करण्यात आल्या आहेत.
परिस्थितੀ नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली पोलीस आणि केंद्र शासनाचे सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून, प्रवाशांनी घराबाहेर पडताना वाहतुकीच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: तेरवाडमध्ये भरधाव कंटेनरचा थैमान; पादचारी महिला व दुचाकीस्वारांना चिरडल्याने चारजण जागीच ठार, चालक पसार
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!























Subscribe to my channel


