नाशिक: संसार सुखाचा होईल या आशेने माहेरून लाखो रुपये आणि सोने देऊनही सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या जेलरोड परिसरात घडली आहे. आशा प्रवीण घोटेकर असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी उपनगर पोलिसांनी पतीसह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे शहरात हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जमीन विकून दिले पैसे, तरीही हव्यास कायम
मिळालेल्या माहितीनुसार, आशा घोटेकर यांचा विवाह झाल्यानंतर काही काळातच त्यांचा छळ सुरू झाला होता. सासरच्या मंडळींकडून फ्लॅट खरेदी करण्यासाठी आणि चारचाकी वाहन घेण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. बहिणीचा संसार टिकावा या भावनेतून आशा यांच्या भावाने स्वतःच्या आईच्या नावावर असलेली जमीन विकून सासरच्यांना मोठी रक्कम दिली होती. लग्नावेळी २१ तोळे सोनेही देण्यात आले होते. मात्र, एवढे करूनही सासरच्यांचा पैशांचा हव्यास आणि छळ थांबला नाही, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
जादूटोण्याची धमकी आणि अनैतिक संबंधाचा आरोप
तक्रारीनुसार, आशा यांना केवळ आर्थिक कारणावरूनच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही खच्ची केले जात होते. पती प्रवीण घोटेकर याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आशा यांना होता, ज्यावरून घरात सतत वाद होत असत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सासरच्यांकडून आशा यांना 'जादूटोणा करून संपवून टाकू' अशा धमक्या दिल्या जात होत्या. सततचा मानसिक दबाव आणि कौटुंबिक छळामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. अखेर या जाचाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांची कारवाई आणि तपास
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली. मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतीसह दोघांना अटक केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील इतर लोकांच्या सहभागाची चौकशी करत असून नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत. यामध्ये नेमका आर्थिक व्यवहार कसा झाला आणि छळाचे स्वरूप काय होते, याचा सविस्तर शोध घेतला जात आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




