मुंबई: राजकीय वर्तुळात सध्या निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेवरून आणि मतमोजणीबाबत जोरदार वाद सुरू असतानाच, भारतीय जनता पक्षाने (BJP) काँग्रेस पक्षावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर सविस्तर पोस्ट शेअर करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "सोयीनुसार आपले रंग बदलणे आणि राजकीय स्वार्थासाठी लोकशाही संस्थांवर खोटे आरोप करणे हाच काँग्रेस पक्षाचा जुना राजकीय पराक्रम राहिला आहे," अशी घणाघाती टीका रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
'व्होट चोरी'च्या आरोपांवरून काँग्रेसवर प्रहार
काही दिवसांपासून देशभरात निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेवरून आणि मतदार याद्यांमधून नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवले आहे. राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांनी या मुद्द्यावरून दिल्लीत जोरदार निदर्शने आणि आंदोलन केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राहुल गांधींच्या आरोपांची चांगलीच पोलखोल केली आहे.
रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ज्या राज्यांमध्ये तब्बल चाळीस-चाळीस वर्षे काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री होऊ शकला नाही, तिथे प्रत्यक्षात त्यांच्याच मित्रपक्षांची किंवा विरोधकांची सत्ता होती. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा पराभव समोर दिसू लागतो, तेव्हा 'व्होट चोरी'चा (मत चोरीचा) खोटा कांगावा सुरू केला जातो. राहुल गांधी आणि काँग्रेस नेते सोयीच्या राजकारणासाठी अशा मुद्द्यांचा वापर करतात, परंतु त्याच राज्यांमधील मूळ वास्तवाबाबत ते तोंडातून 'ब्र' देखील काढत नाहीत."
"चोराच्या उलट्या बोंबा" - रवींद्र चव्हाणांची टीका
जनतेने वारंवार नाकारल्यानंतर आता थेट देशाच्या लोकशाही संस्थांवर, निवडणूक प्रक्रियेवर आणि स्वायत्त यंत्रणांवर अविश्वास दाखवणे ही काँग्रेसची जुनीच सवय असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. जनतेचा कौल स्वीकारण्याची तयारी नसताना अशा पद्धतीचे निराधार आरोप करणे म्हणजे नेमकी "चोराच्या उलट्या बोंबा" अशीच गत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
देशभरात सुरू असलेल्या या राजकीय कलगीतुऱ्यामुळे सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि मतमोजणीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांना भाजपने आता अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.
शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel



