पुण्यात खळबळ! रेल्वे रुळावर बसून गांजा पिणाऱ्यांना हटकल्याचा राग, टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा कोयत्याने चिरला गळा!

गुन्हेगारी घटनांमुळे आणि कोयता गँगच्या दहशतीमुळे सतत चर्चेत असलेल्या पुणे शहरातून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळांवर बसून गांजाचे सेवन करणाऱ्या एका मद्यपी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्याने कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलीस शिपायावर प्राणघातक हल्ला केला आहे. आरोपींनी थेट कोयत्याने वार करून पोलीस कर्मचाऱ्याचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण पोलीस दलात आणि नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळांजवळ काही तरुणांचा एक गट बेकायदेशीरपणे बसून गांजा पित असल्याचे निदर्शनास आले. याच परिसरात कर्तवयावर असलेले पोलीस शिपाई अक्षय बांबल यांनी संबंधित संशयित तरुणांना रेल्वे रुळावर गांजा ओढण्यापासून रोखले आणि हटकले. मात्र, यामुळे संतापलेल्या या नशेत धिंगाणा घालणाऱ्या टोळक्याने पोलिसाशीच वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसक हल्ल्यात झाले आणि या टोळीतील आरोपींनी अत्यंत निर्दयीपणे धारदार कोयत्याने पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्या गळ्यावर गंभीर वार केले.

अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे बांबल हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लोहमर्ग व शहर पोलीस दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या पोलीस शिपाई अक्षय बांबल यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सार्वजनिक आणि अत्यंत वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसावरच असा जीवघेणा हल्ला झाल्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा व कायद्याचा अजिबात उरलेला धाक पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे आणि त्यांना जेरबंद करण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *