एकदा एका माणसाने एका चिमणीला पकडले. चिमणीने ‘आपल्याला जीवदान द्यावे. त्या बदल्यात तीन धडे शिकवेल. यातून तुमचे जीवन सुधारेल,’ अशी याचना चिमणीने केली. चिमणी किलबिलाट करत म्हणाली, “तुम्ही मला मुक्त केले तर मी तुम्हाला पहिला धडा शिकवेन. दुसरा धडा मी माझ्या समोर असलेल्या त्या झाडावर बसेन तेव्हा देईल. आणि तिसरा मी आकाशात उडेन तेव्हा देईल.’ मग त्या व्यक्तीने उत्सुकतेने तिची सुटका केली. चिमणी जवळच्या कुंपणावर बसली आणि त्याला पहिला धडा शिकवला : भूतकाळाबद्दल कधीही शोक करू नका; तो वेळेचा अपव्यय आहे. त्या व्यक्तीने खांदे उडवले आणि म्हटले की त्याला अशा गोष्टी आधीच माहीत आहेत. मग चिमणी एका उंच फांदीवर उडून गेली आणि त्याला दुसरा धडा शिकवला : तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहत नाही तोपर्यंत कधीही कोणावरही विश्वास ठेवू नका, भलेही तो जवळचा का असेना. या वेळीही त्या व्यक्तीने त्यास क्षुल्लक म्हणून फेटाळून लावले. मग पक्ष्याने खाली पाहिले आणि म्हणाला, “तू खूप मोठी चूक केली आहेस. माझ्या शरीरात दोन मोठे हिरे आहेत. तू मला मारले असतेस तर तू पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस असतास.
त्या व्यक्तीचे हृदय पिळवटून गेले. त्याने आपल्या चुकीबद्दल दु:ख व्यक्त केले आणि पश्चात्ताप केला. मग त्याने वर पाहिले आणि तिसरा धडा मागितला. या आशेने की किमान एक तरी त्याला उपयुक्त ठरेल. पक्षी म्हणाला, “मी तुला तिसरा धडा का शिकवू? तू आधीच्या दोन धड्यांकडे दुर्लक्ष केलेस. तू भूतकाळाबद्दल दु:ख व्यक्त केलेस आणि एका चिमणीत दोन मोठे हिरे असू शकतात या अशक्य गोष्टीवरही विश्वास ठेवला. मनुष्याने आपल्या प्रगतीसाठी ज्ञान मिळवले होते. भौतिक संपत्ती गोळा केली होती. परंतु ती वापरण्याची बुद्धी त्याने गमावली आहे,’ असे म्हणत पक्षी उडून गेला. या शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल वाचताना मला ही बोधकथा आठवली. हा खटला एका मुलाशी संबंधित होता. त्याने “हिऱ्या’सारख्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या आमिषाने आपल्या वडिलांच्या मालमत्तेच्या एक तृतीयांश भागावर दावा केला. वडिलांनी विरोध केला. तेव्हा वाद घालण्याऐवजी किंवा कौटुंबिक कर्तव्याचा उल्लेख करण्याऐवजी मुलाने कायद्याचे ज्ञान शस्त्र म्हणून वापरले आणि मानसिक आरोग्यसेवा कायद्याच्या तरतुदींचा वापर करण्यासाठी याचिका दाखल केली. त्याने आपल्या वडिलांच्या मानसिक स्थितीची स्वतंत्र मूल्यांकनाची मागणी केली. आणि अशा प्रकारे वृद्धाची त्याला आव्हान देण्याची कायदेशीर क्षमता हिरावून घेतली. या खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती फरहान दुबाश यांनी ही चाल लक्षात घेतली. मुलाची याचिका कायदेशीर प्रतिकाराच्या मुळावर प्रहार करण्याचा स्पष्ट प्रयत्न होता. एमएचएला कमकुवत करणे आणि असुरक्षित व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी ढाल म्हणून केले होते. परंतु मुलाने त्याचा वापर तलवारीसारखा करून वडिलांचा कायदेशीर दर्जा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुलासाठी त्याचे वडील आता पालक राहिले नाहीत तर केवळ मालमत्तेमधील अडथळा होते आणि त्याच्या सर्व युक्त्या लोभातून जन्माला आल्या होत्या. ही कायदेशीर लढाई चिमणीने दिलेल्या इशाऱ्याला अधोरेखित करणारी आहे. माणसाने भौतिक प्रगतीसाठी ज्ञान मिळवले, परंतु आपला विवेक हरवून टाकला. चिमणी असो किंवा इतर कोणताही पक्षी... ते स्वतःच्या पिल्लांना वाढवण्यासाठी कधीही दुसऱ्या पक्ष्याचे घरटे नष्ट करत नाहीत. परंतु मुलगा वडिलांच्या विचारसरणीत कायदेशीर त्रुटी शोधू लागतो तेव्हा तो कुटुंबाचा वारसा याकडे ताब्यात घेण्यायोग्य मालमत्ता म्हणून बघू लागतो. तेव्हा त्या चिमणीचे म्हणणे खरे वाटते. 10 मार्च 1876 रोजी ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावला. 1887 मध्ये जर्मन-अमेरिकन शोधक एमिल बर्लिनर यांनी फ्लॅट-डिस्क ग्रामोफोन तयार केला. 3 एप्रिल 1973 रोजी मोटोरोला अभियंता मार्टिन कूपर यांनी पहिला हाताळता येणारा मोबाइल फोन विकसित केला होता. ध्वनी क्षेत्रातील हे सर्व शोध मानवी प्रजातीकडे ज्ञान असल्यामुळे शक्य झाले. परंतु त्याच मानवी प्रजातीचा एक मुलगा त्याच्या घरात राहणाऱ्या आपल्या वडिलांचा आवाज ऐकू शकत नाही. म्हणूनच माणूस म्हणून आपण बुद्धी गमावून बसलो आहोत ही बाब एका चिमणीलादेखील समजते असे म्हणावे लागते. फंडा असा की - संपत्तीचा लोभ सर्वात “शिक्षित’ व्यक्तीलादेखील एका क्षणात मूलभूत तर्कशुद्ध आणि नैतिक तत्त्वांविषयी अंध बनवू शकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




