यवतमाळ: येथील जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली असून, नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच लातूर येथील जिल्हा बँकेच्या आठ संचालकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नोटीस बजावून १० सप्टेंबरपर्यंत खुलासा मागितला आहे. दहा वर्षे कार्यकाळ पूर्ण केलेल्या संचालकांना पुन्हा निवडणुकीत उभे राहता येत नाही, या संदर्भातील हे प्रकरण आहे. आरबीआय या प्रकरणात काय निर्णय देते याकडे यवतमाळच्या सहकार वर्तळाचे लक्ष लागले आहे.
आरबीआयने बँकिंग कायदे (सुधारणा) कायदा, २०२५ अंतर्गत सहकारी बँकांमधील संचालकांचा कार्यकाळ दहा वर्षे निश्चित केला. त्यानंतर सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या पायाखालची वाळूच सरकली. दरम्यान लातूर येथील आठ संचालकांना नवीन कायद्यानुसार अपात्र करावे, असे निवेदन आरबीआय व नाबार्डकडे सादर झाले होते. परंतु, दोन महिन्यात कुठलीच कारवाई न झाल्याने निवेदनकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.
सतीश शेषराव जाधव विरुद्ध भारत संघ, केंद्रीय सहकार मंत्रालय व इतर या प्रकरणात न्यायालयाने ३ ऑगस्ट रोजी आरबीआयला २५ मे २०२६ रोजीच्या निवेदनावर सहा आठवड्यात गुणवत्तेवर निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरबीआयने आठ संचालकांना नोटीस बजावली. १० सप्टेंबरपर्यंत म्हणणे सादर न केल्यास निर्णय घेण्यात येईल, असे नमूद केले आहे. लातूर येथील जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. १५ सप्टेंबरपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी दोन दिवसांपासून नामांकन भरले जात आहे. लातूर येथील प्रकरणात आरबीआयने नोटीस काढल्याने यवतमाळ जिल्ह्यातील सहकार वर्तुळातही धाकधूक वाढली आहे. लातूर येथील आठ संचालकांसंदर्भात आरबीआय काय निर्णय देते आणि त्याचे परिणाम जिल्ह्याच्या सहकार वर्तुळावर होतात का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्यात ९ संचालक, ११ ऑक्टोबर रोजी निवडणूक
आरबीआयच्या नवीन कायद्यानुसार १० वर्षे कार्यकाळ झालेले ९ संचालक जिल्ह्यात आहेत. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, सहकारातील वातावरण चांगलेच तापले आहे. ११ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत असून, नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच लातूर येथील प्रकरणात काय निर्णय होणार यावरून नेत्यांची चिंता वाढली आहे.
सहकार विभागाच्या पत्रात काय?
बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ मधील कलम १०१ (२ अ) (१) मध्ये झालेल्या सुधारणेनुसार सलग १० वर्षे कार्यकाळ पूर्ण केलेले सहकारी बँकांचे संचालक वैधानिकदृष्ट्या अपात्र ठरण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. तथापि, बँकिंग नियमन अधिनियमातील या नवीन तरतुदीनुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये संचालकांना अपात्र करण्याबाबत अद्याप तरतूद करण्यात आलेली नाही. विधि व न्याय विभागाने दिलेल्या या अभिप्रायास अनुसरून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या, असे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी तेजल पारडे यांनी २१ ऑगस्ट रोजी सहकार आयुक्त व निबंधक, पुणे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिव यांना दिले होते.
शहर
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!




























Subscribe to my channel



