बीड: नोकरीचे आमिष दाखवून परदेशात नेऊन तरुणांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थायलंडमध्ये ७० हजार रुपये पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा रहिवासी असलेला स्वप्निल कलुंके याच्यासह सुमारे ७०० भारतीयांना म्यानमारच्या सीमेवरील एका दुर्गम छावणीत ओलीस ठेवण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय सायबर माफियांच्या तावडीतून भारतीयांची सुटका करण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि गुप्तचर विभाग (IB) सक्रिय झाले आहेत.
नेमका प्रकार काय?
नोकरीच्या आमिषाने स्वप्निल याला ४ जून रोजी पुण्यातून बँकॉकमध्ये बोलावण्यात आले होते. मात्र, बँकॉकला पोहोचताच त्याला आणि इतर तरुणांना बळजबरीने म्यानमार सीमेवरील 'गोल्डन ट्रँगल' भागात नेण्यात आले. तिथे त्यांचे पासपोर्ट आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे हिरावून घेत त्यांना एका बंदिस्त छावणीत ठेवले गेले आहे.
नरकयातना आणि सायबर गुलामगिरी:
येथे अडकलेल्या तरुणांना बंदुकीच्या धाकावर दिवसातून १८-१८ तास ऑनलाईन फसवणुकीचे (सायबर फ्रॉड) काम करण्यास भाग पाडले जात आहे. जर कोणी काम करण्यास नकार दिला किंवा उद्दिष्ट (टार्गेट) पूर्ण केले नाही, तर त्यांना अमानवीय वागणूक दिली जाते. यामध्ये विजेचे शॉक देणे आणि बेदम मारहाण करण्याचा समावेश आहे. स्वप्निलने त्याच्या पत्नीला लपूनछपून फोन करून आपली बिकट परिस्थिती सांगितली. त्याने "येथे माझा जीव धोक्यात आहे आणि माझ्या डोळ्यासमोर तीन जणांना मारून टाकण्यात आले आहे," अशी धक्कादायक माहिती दिली आहे.
प्रशासनाची हालचाल:
बीड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या मुळाशी जाण्यासाठी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही स्तरांवर या तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




