वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं मानलं जातं की दररोज घरात पूजा, प्रार्थना केल्यामुळे सर्व प्रकारची नकारात्म ऊर्जा नष्ट होते, घरात सुख, शांती समृद्धी येते. तुम्ही जर दररोज देवाची पूजा करत असाल मनोभावे प्रार्थना करत असाल तर त्यामुळे तुमच्या मनाला देखील शांती मिळते. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळतं. मात्र कोणतेही धार्मिक विधी हे योग्य नियमानुसारच व्हायला हवेत, तरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं. त्यामुळे पूजेचे सर्व नियम समजून घेणं गरजेचं असतं. घरात सकाळी आणि संध्यांकाळी केल्या जाणाऱ्या पूजेचं विशेष महत्त्व असतं.सकाळी पूजा करताना देवाला जल, फूल, गंध आणि नवैद्य या गोष्टी अर्पण कराव्यात, या गोष्टींचं पूजेमध्ये विशेष महत्त्व असतं. तर सायंकाळच्या पूजेवेळी दिव्याचं विशेष महत्त्व असतं. आज आपण देवासमोर दिवा लावण्याचे योग्य नियम काय आहेत? तसेच देवघरासमोर तर दिवा लावला गेलाच पाहिजे, मात्र त्या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार घरात अन्य कुठे-कुठे दिवा लावणं शुभ आहे? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
घराचा मुख्य दरवाजा – वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी घराच्या मुख्य द्वारासमोर एक दिवा नित्यनियमाने लवला गेला पाहिजे. यामुळे घरात येणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते, त्यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात, आणि घरात सुख, शांती समृद्धी येते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.
तुळशीजवळ लावा दिवा – तुळस ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे, ज्या घरात तुळस आहे, ज्या घरात नियमितपणे तुळशीची पूजा होते, त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद राहतो. त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्यामुळे सायंकाळच्यावेळी नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
या गोष्टी देखील लक्षात ठेवा – दिवा लावताना काही गोष्टी या लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा त्याचं फळ मिळत नाही. दिवा लावताना दिव्यामध्ये नेहमी शुद्ध तेलच वापरावे, तसेच तुम्ही दिव्यासाठी जे तेल वापरणार आहात, ते तेल वेगळं ठेवावं, आणि त्याच तेलापासून दररोज तीन ठिकाणी तुमच्या देवघरासमोर, घराच्या मुख्य दरवाजाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावावा, तसेच दिवा लावता दिव्याचं तोंड हे नेहमी पूर्व-पश्चिम असावं, दिवा कधीही दक्षिणेकडे तोंड करून लावू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



