पश्चिम बंगाल: एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दूरच्या नातेवाईक (भाची) वृष्टी मुखर्जी (वय २८) यांचा बीरभूम जिल्ह्यातील घरी संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आला आहे. त्या रामपुरहाट येथील कुसुमबा गावात राहत होत्या. मंगळवारी सकाळी त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत त्या मृतावस्थेत आढळल्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.माहिती मिळताच रामपुरहाट पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोली सील केली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रामपुरहाट सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे.
एसएससी भरती घोटाळ्यात गेली होती नोकरी
वृष्टी मुखर्जी या बोलपूर येथील एका उच्च प्राथमिक विद्यालयात 'नॉन टीचिंग' (ग्रुप-सी क्लर्क) पदावर कार्यरत होत्या. मात्र, २०१६ च्या पश्चिम बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशनच्या बहुचर्चित शिक्षक व कर्मचारी भरती घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आले होते. कलकत्ता उच्च न्यायालयाने भरती प्रक्रियेत अनियमितता आढळल्याने रद्द केलेल्या सुमारे २६,००० पदांमध्ये वृष्टी यांच्याही नियुक्तीचा समावेश होता. रद्द करण्यात आलेल्या अधिकृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या यादीत वृष्टी मुखर्जी यांचे नाव ६०८ व्या क्रमांकावर होते. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा हा निर्णय कायम ठेवला होता.
राजीनामा आणि बेरोजगारी
न्यायालयाच्या आदेशानंतर आणि नोकरीवर टांगती तलवार आल्यानंतर त्यांनी स्वतःहूनही राजीनामा दिला होता. मार्च २०२३ मध्ये नोकरी गमावल्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता.
घटस्फोटाचा खटला आणि तीव्र नैराश्य
वृष्टी मुखर्जी या ममता बॅनर्जीचे मामा आणि नेते निहार मुखर्जी यांच्या कन्या होत्या. कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात त्या गेल्या काही काळापासून मोठ्या तणावात होत्या. त्या गेल्या काही महिन्यांपासून पतीपासून विभक्त राहत होत्या आणि न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू होता. नोकरी जाणे आणि वैवाहिक आयुष्यातील वाद या दुहेरी संकटामुळे त्या तीव्र नैराश्यात होत्या आणि त्यांच्यावर मानसोपचारही सुरू होते, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.
पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी कुटुंबीय आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात नैराश्यातून हे आत्मघातकी पाऊल उचलल्याचा संशय असला, तरी शवविच्छेदन आणि व्हिसेरा तपासणीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
शहर
- मुंबई: सायन रुग्णालयात धक्कादायक घटना: पदव्युत्तर निवासी डॉक्टर शिवशरणप्पा पाटील यांचा हॉस्टेलच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळला; ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसने संपवलं आयुष्य!
- मुंबई: अवघ्या आठ महिन्यात पाणी गळती आणि जलवाहिनी फुटण्याच्या १७ हजारांहून अधिक तक्रारी दाखल!
- पुणे: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल: सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचे विजयाचे खाते उघडले, ‘ब’ गटातून संग्राम सोर्टे विजयी!
- पुणे: मराठी कलाविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी निधन!
महाराष्ट्र
- मुंबई: सायन रुग्णालयात धक्कादायक घटना: पदव्युत्तर निवासी डॉक्टर शिवशरणप्पा पाटील यांचा हॉस्टेलच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळला; ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसने संपवलं आयुष्य!
- मुंबई: अवघ्या आठ महिन्यात पाणी गळती आणि जलवाहिनी फुटण्याच्या १७ हजारांहून अधिक तक्रारी दाखल!
- कोल्हापूर: ‘गोकुळ’ निवडणुकीवरून राजकारण तापले! महायुतीला चिन्ह मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दबाव, आमदार सतेज पाटील यांचा जोरदार घणाघात!
- पुणे: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल: सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचे विजयाचे खाते उघडले, ‘ब’ गटातून संग्राम सोर्टे विजयी!
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!























Subscribe to my channel



