मुंबई: ठाण्यातील भिवंडी परिसरात अत्यंत दुर्दैवी आणि मोठी दुर्घटना घडली आहे. भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून संयुक्तपणे युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत २००७ मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीत दोन विंग असून एकूण ३० घरे होती. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत सुरुवातीपासूनच कमकुवत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेने यापूर्वीच तिला अतिधोकादायक म्हणून घोषित केले होते. गुरुवारी तळमजल्यावरील काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजल्यापासूनच इमारतीला तडे जाऊ लागले होते आणि रात्री आठच्या सुमारास ती एका बाजूला झुकू लागल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी तातडीने कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत इमारत रिकामी करण्याची कारवाई केली होती. मात्र, प्रशासनाची कारवाई झाल्यानंतरही तळमजल्यावरील दुरुस्तीचे काम सुरूच ठेवण्यात आले होते. तसेच काही रहिवासी घरातील महत्त्वाचे साहित्य किंवा कागदपत्रे घेण्यासाठी पुन्हा इमारतीत गेले होते, त्याच दरम्यान इमारत अचानक कोसळली आणि ते दुर्दैवाने ढिगाऱ्याखाली अडकले.
जेसीबीसह विविध आधुनिक यंत्रणांच्या मदतीने मलबा आणि ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत शमीम शेख (३२), रंजीत सिंग (४५), मिराज रसूल शेख (३४), संतोष कुमार पांडे (४२) आणि शमीम अन्सारी (३०) यांसह इतरांचा मृत्यू झाला असून काही मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून बचावकार्य जोमाने सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
- मुंबई: महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! आता शेतीशी संबंधित सर्व व्यवहार एकाच डिजिटल छताखाली होणार, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
महाराष्ट्र
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- कोल्हापूर: महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा; कोल्हापूरच्या नांदणी मठात लवकरच परतणार लाडकी 'माधुरी'!
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- जालना: अमृता फडणवीस यांनी प्रेमाने जेवणाचं आमंत्रण दिलं, तर भाऊबिजेला नक्की घरी जाईन मनोज जरांगे पाटील
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा



























Subscribe to my channel



