मुंबई: महाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाला गती देण्यासाठी आणि प्रशासकीय खर्चात बचत करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या मंत्रालयीन कार्यालयांमध्ये तसेच त्यांच्या शासकीय निवासांवर (बंगल्यांवर) पुरवली जाणारी छापील वृत्तपत्रे आणि नियतकालिके (मासिके व पाक्षिके) पूर्णपणे बंद केली जाणार आहेत. यापुढे मंत्र्यांना बातम्यांसाठी केवळ ऑनलाइन सदस्यत्व (ई-पेपर व न्यूज पोर्टल्स) घ्यावे लागणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने (GAD) यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना अपवाद, वर्षाला २२ ते २५ लाखांची बचत: या निर्णयामधून मुख्यमंत्री कार्यालयाला व त्यांच्या शासकीय निवासस्थानाला अपवाद ठरवण्यात आले असून, तेथे पूर्वीप्रमाणेच छापील वृत्तपत्रे पुरवली जातील. सामान्य प्रशासन विभागाच्या मते, दरवर्षी सर्व मंत्र्यांच्या छापील वृत्तपत्रांवर राज्याच्या तिजोरीतून सुमारे २२ ते २५ लाख रुपयांचा खर्च होत असे. डिजिटल सबस्क्रिप्शन ई-पेपरच्या माध्यमातून स्वस्त पडत असल्याने यामुळे शासनाची मोठी बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे.
मंत्र्यांना स्वतः खरेदी करावी लागणार ऑनलाइन सदस्यता: नव्या नियमानुसार, मंत्रालयीन विभागांना आणि मंत्र्यांना आवश्यक असणाऱ्या वृत्तपत्रांचे ऑनलाइन सबस्क्रिप्शन स्वतः घ्यावे लागेल आणि सादर केलेल्या बिलांनुसार त्या-त्या प्रशासकीय विभागाकडून हा खर्च भागवला जाईल.
वृत्तपत्र विक्रेत्यांचा तीव्र विरोध व आंदोलनाचा इशारा: शासनाच्या या निर्णयावर वृत्तपत्र विक्रेते संघटना आणि विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय वृत्तपत्र व्यवसायावर आणि विक्रेत्यांच्या रोजगारावर गदा आणणारा आहे, असा आरोप करत हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




