अमरावती: महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत 'मराठी भाषा' शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने अत्यंत कठोर पावले उचलली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर १ लाख रुपयांपर्यंत दंड आणि वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास थेट शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे नवीन शासन निर्णय (GR)?
शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, 'महाराष्ट्र कंपल्सरी टीचिंग अँड लर्निंग ऑफ मराठी लँग्वेज इन स्कूल्स ॲक्ट, २०२०' ची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात आली आहे. राज्यातील अनेक खासगी आणि आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सरकारने ही भूमिका घेतली आहे.
कारवाईची प्रक्रिया कशी असेल?
१. तपासणी पथक: शाळा सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत शिक्षण उपसंचालक किंवा शिक्षणाधिकाऱ्यांचे विशेष पथक शाळांची तपासणी करेल. यामध्ये अनुभवी मराठी शिक्षकांचा समावेश असेल.
२. नोटीस आणि खुलासा: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस बजावली जाईल. या नोटिसीला १५ दिवसांच्या आत शाळा व्यवस्थापनाला लेखी खुलासा सादर करावा लागेल.
३. दंडात्मक कारवाई: जर शाळा व्यवस्थापनाचा खुलासा असमाधानकारक आढळला, तर संबंधित शाळेला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.
४. मान्यता रद्द करणे: दंड आकारूनही जर शाळेने मराठी विषयाचे अध्यापन सुरू केले नाही, तर शिक्षण आयुक्त स्तरावर सुनावणी होईल आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते.
मराठी भाषेचे अध्यापन प्रभावी करण्यासाठी उपाय:
शासनाने स्पष्ट केले आहे की, मराठी हा विषय केवळ कागदोपत्री अनिवार्य न राहता, तो प्रत्यक्ष वर्गात शिकवला जावा आणि त्याची परीक्षाही घेतली जावी. सर्व शाळांना पात्र मराठी शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ कागदपत्रे तपासली जाणार नाहीत, तर वर्गातील अध्यापन, परीक्षेचे रेकॉर्ड आणि शिक्षकांची उपलब्धता याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचा त्यांच्या मातृभाषेशी असलेला संबंध दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




