नागपूर: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नागपूरमधील गोधनी ग्रामपंचायत परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्रीनंतर एका ९०० किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅसच्या सिलिंडरमधून अचानक विषारी गळती झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात भीषण आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. गंजलेल्या आणि जुन्या सिलिंडरमधून गळलेला हा विषारी वायू वाऱ्याच्या वेगाने लगतच्या दाट वस्तीच्या नागरी वसाहतींमध्ये पसरल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली. रात्रीच्या वेळी अचानक श्वास अडकणे, घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि उलट्या होण्याचा त्रास सुरू झाल्यामुळे नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावरा पळू लागले.
५६ नागरिक रुग्णालयात दाखल; लहान मुलांसह काही जणांची प्रकृती चिंताजनक
या विषारी गॅसच्या बाधेमुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह एकूण ५६ नागरिकांना तातडीने उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले. यातील ११ रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर प्रकृती स्थिरावल्याने घरी सोडण्यात आले, तर अद्यापही ४५ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. श्वास घेण्यास तीव्र त्रास होत असल्याने आणि प्रकृती खालावल्याने काही रुग्णांना थेट अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले असून त्यांच्यावर विशेष वैद्यकीय देखरेख ठेवली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून बाधित रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली आहेत.
प्रशासन आणि एनडीआरएफची तातडीची कारवाई; परिस्थिती नियंत्रणात
गळतीची माहिती मिळताच नागपूरचे जिल्हाधिकारी, मनपा प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा, आरोग्य विभाग तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने प्रसंगावधान राखत बाधितांच्या सुरक्षेसाठी तातडीने परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. गळती रोखण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी व अग्निशामक दलाने अत्यंत शर्थीचे प्रयत्न करत गळती असलेला तो ९०० किलोचा सिलिंडर पूर्णपणे पाण्यात बुडवून वायूची गळती यशस्वीरीत्या आटोक्यात आणली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री चंद्रशेखराव बावनकुळे यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रभावित परिसरामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू केली असून, या प्रकाराची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




