
Smartana Patil Pune Crime :पुण्यातील गुन्हेगारी रोखणं हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. काही सक्रिय गॅंग आणि अन्य काही गुन्ह्यामुळे पुणे शहराची ओळख गुन्हेगारीचं शहर अशी होताना दिसत आहे. त्यामुळे या सगळ्या गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना आळा घालणं आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मोहीम सध्या पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे. यात परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी शहरातील विविध भागात गंभीर गुन्हे करणाऱ्या 12 कुख्यात गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सूरज ताजमोहंमद सिद्दीक (वय 20, रा. गुलटेकडी), विवेक बाबुराव चोरगे (वय 23, रा. बालाजीनगर, धनकवडी), धीरज रंगनाथ आरडे (वय 25, रा. पद्मावती), गणेश सुनील मोरे (वय 26, रा. धनकवडी), किरण वामन जगताप (वय 25, रा. पद्मावती), तानाजी राजाभाऊ जाधव (वय 38, रा. संतोषनगर, कात्रज), प्रदीप रामा जाधव (वय 29, रा. जांभूळवाडी, कात्रज), गणेश विजय भंडलकर (वय 21, रा. कात्रज). ), आदित्य उर्फ दिनेश युवराज ओव्हाळ (वय 22, रा. कोरेगाव पार्क), सागर कल्याण माने (वय 30, रा. कोरेगाव पार्क), अरबाज हसन कुरेशी (वय 23, रा. जाफरीन लेन, लष्कर), रोहन मल्लेश तुपधर (वय. 23, रा. ताडीवाला रोड) अशी पोलिसांनी शहरातून हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.
वेगवेगळ्या गुन्ह्यांची होती नोंद
पकडलेल्या गुन्हेगारांवर स्वारगेट, सहकारनगर, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क, लष्कर, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातून पसार होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गुन्हेगारांवर खुनाचा प्रयत्न, आर्थिक फसवणूक, दरोडा, खंडणी, विनयभंग, सरकारी कामात अडथळा, अवैध शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढील काळात गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.
शहरात 2880 CCTV कॅमेरे बसवणार
पुणे पोलिसांनी शहरात 2880 नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या हालचालींवर पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. गेल्या दशकभरात घडलेल्या गुन्ह्यांचा सखोल आढावा घेऊन चोरी, दरोडे, मारामारी आणि अपघातांची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
शहर
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
महाराष्ट्र
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- सातारा: कृष्णा-कोयना काठच्या पिकांवर मोठे संकट; प्रशासनाकडून पीक पाहणीचा सविस्तर अहवाल सादर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
गुन्हा
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल

























Subscribe to my channel




