कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद

कोल्हापूर: जिल्ह्यातील सरनोबतवाडी (ता. करवीर) परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका सनसनाटी खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून दिरानेच आपल्या वहिनीची हातोड्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पसार झालेल्या नराधम दिराला बेड्या ठोकल्या आहेत.

हत्येचे नेमके कारण आणि पार्श्वभूमी: मृत महिला रुक्मिणी धर्मेंद्र साहणी (वय २४, मूळ रा. बेलौहा, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. मणेरमाळ, उचगाव) असे या मृत महिलेचे नाव आहे. आरोपी दीर आणि मृत महिला यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातच आरोपीचे लग्न मृत महिलेच्या बहिणीशी ठरले होते. यावरून त्यांच्यामध्ये तीव्र वाद झाला होता. याच वादातून आरोपीने संतापाच्या भरात हातोड्याने डोक्यात जोरदार वार करून रुक्मिणी साहणी यांची हत्या केली.

पोलिसांची कारवाई: गुन्हा घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. करवीर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक विश्लेषन व खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे तपास चक्र वेगाने फिरवून आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी अखेर आरोपीला जेरबंद केले असून, त्याला न्यायालयात le गेल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.

 



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *