पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नेत असताना चालत्या रुग्णवाहिकेतून एक बेघर रुग्ण स्ट्रेचरसह भररस्त्यात खाली कोसळल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रुग्णवाहिकेचा मागचा दरवाजा उघडा राहिल्याने हा गंभीर अपघात घडला. विशेष म्हणजे रुग्ण खाली पडल्याचे भानही चालकाला नव्हते; ती अॅम्ब्युलन्स पुढे निघून गेली आणि सुमारे ९० सेकंदांनंतर (दीड मिनिटाने) घटनास्थळी परतली. सुदैवाने त्या क्षणी मागून कोणतेही भरधाव वाहन येत नसल्याने आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवल्याने रुग्णाचा जीव
वाचला.
नेमकी काय आहे घटना?
एका संसर्गबाधित बेघर रुग्णावर पिंपरी येथील YCM रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून जनरल रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. नियमांनुसार रुग्णासोबत कोणतेही नातेवाईक नसल्यामुळे रुग्णवाहिकेत एक पोलीस कर्मचारी तैनात होता. ही रुग्णवाहिका YCM रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताच मागचा दरवाजा अचानक उघडला आणि रुग्ण थेट स्ट्रेचरसह भररस्त्यावर आदळला.
सुरक्षा नियमांचा पुरता फज्जा
या घटनेच्या प्राथमिक तपासणीतून गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहेत. रुग्णवाहिकेच्या आत असलेल्या स्ट्रेचरची चाके सुरक्षिततेसाठी व्यवस्थित लॉकच करण्यात आलेली नव्हती. ज्या कर्मचाऱ्याने किंवा वॉर्डबॉयने रुग्णाजवळ मागे थांबणे आवश्यक होते, तो चालकाच्या शेजारील पॅसेंजर सीटवर जाऊन बसला होता. वाहनाचा मागील दरवाजा व्यवस्थित न लावल्यामुळे स्ट्रेचर घसरून दारावर आदळले आणि दरवाजा उघडून रुग्ण खाली पडला.
नागरिकांचे प्रसंगावधान; चालक व वॉर्डबॉयची एकमेकांवर ढकलाढकली
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. रुग्ण रस्त्यावर पडताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्याला सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला हलवले. सुमारे दीड मिनिटानंतर जेव्हा अॅम्ब्युलन्स परत आली, तेव्हा चालक आणि वॉर्डबॉय एकमेकांवर चूक ढकलत वाद घालताना दिसले. तर पॅसेंजर सीटवर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने "मागचा दरवाजा योग्य प्रकारे बंद नव्हता" असे स्पष्ट केले.
रुग्णालय प्रशासनाकडून नोटीस जारी; सोशल मीडियावर संताप
या गंभीर प्रकाराची दखल घेत YCM रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले की, "या हलगर्जीपणाची गांभीर्याने दखल घेत चालक आणि संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे." दुसरीकडे, या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel





You can definitely see your skills in the artficle you write.
The world hopes for more passionate wriers such as yyou whho aren’t afraid to say how they believe.
At all times followw your heart. xnxx
Look at my site … website (korean.whichav.win)