पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. आगामी सण-उत्सव, मोर्चे, विविध संघटनांची आंदोलने आणि अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शहरात पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) आणि (३) अंतर्गत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
आगामी काळात येणारी बकरी ईद (Bakri Eid) आणि शहरात विविध कारणांवरून होणारी संभाव्य आंदोलने व मोर्चे यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहेत पोलिसांचे निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines):
१. शस्त्रास्त्रांवर बंदी: या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला शहरात सार्वजनिक ठिकाणी लाठ्या, काठ्या, तलवारी, भाले, बंदुका, किंवा इतर कोणतीही जीवघेणी शस्त्रे घेऊन फिरण्यास सक्त मनाई असेल.
२. स्फोटक पदार्थांवर बंदी: सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे स्फोटक, ज्वालाग्रही पदार्थ किंवा दगड गोळा करणे, वाहून नेणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
३. पुतळे आणि फलक प्रदर्शनास मनाई: कोणत्याही व्यक्तीचे पुतळे तयार करणे, प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढणे, पुतळे जाळणे किंवा प्रक्षोभक फलक व चित्रे लावण्यास बंदी असेल.
४. भाषणे आणि घोषणांवर निर्बंध: सार्वजनिक शांतता भंग होईल, नीतिमत्तेला बाधा येईल किंवा धार्मिक-सामाजिक सलोखा बिघडेल अशी प्रक्षोभक भाषणे करणे, घोषणा देणे किंवा वाद्ये वाजवण्यावर पोलिसांचे कडक नियंत्रण असेल.
५. जमावबंदीचे नियम: कलम ३७ च्या उपकलम ३ नुसार, सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मोर्चे काढण्यास बंदी असेल.
यांना नियमातून सूट:
हा आदेश शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना, पोलिसांना, विवाह सोहळे, अंत्ययात्रा तसेच पूर्वपरवानगी घेतलेल्या धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांना ठराविक अटींनुसार लागू असणार नाही.
पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




