
Sanjay Raut : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण शिवरायांची एकदा नाही १०० वेळा माफी मागायला तयार आहोत, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना संजय राऊतांनी घणाघाती टीका केली. “माफी मागून असे विषय सुटतात का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं? या घटनेत आरोपी आपटे असले तरी मुख्य आरोपी त्यांना काम देणारे आहेत आणि ते ठाण्यातील आहेत”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत काय म्हणाले?
“खरं म्हणजे दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील या ठिकाणी आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकून ठेवलेला पुतळा आम्हाला दुर्देवाने पाहायला मिळतोय. लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाज मनावर झालेला आहे. महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे. आता राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. इतकं होऊन देखील हे राज्य सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. कारण यामध्ये आर्थिक व्यवहार गुंतलेले आहेत. आपआपल्या माणसांना आणि ठेकेदांना काम देऊन सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही. तेथील आसपासच्या घरांची कौलं पडली नाहीत. मग पुतळा कसा पडला?”, असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.
|
|
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आणि काही अधिकारी इतके खोटे बोलत आहेत की त्यांना जनाची आणि मनाची उरलेली नाही. ते सांगता आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला. मग वाऱ्यामुळे तुमचे कॅमेरे उडाले नाहीत. तेथील बाकीचे सेड्स पडले नाहीत. त्या दिवशी वाऱ्यामुळे झाडं पडली नाहीत. मात्र, पुतळा पडला. मग किती खोटं बोलणार? हे सरकार भारतीय नौदलावर जबाबदारी ढकलत आहेत. भारतीय नौदलाने हिमालयावरही काही स्मारकं उभे केलेले आहेत. मग तेथे तर बर्फ वितळत असतो. तेथे देखील भारतीय नौदलाने काही पुतळे उभे केलेले आहेत. मात्र, या घटनेची जबाबदारी तुम्ही भारतीय नौदलावर ढकलता. तुम्ही तुमच्या पापाचं खापर भारतीय नौदलावर फोडता”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
“राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचे शिल्पकार कोणीतरी आपटे म्हणून आहेत. त्यांना अनुभवच नव्हता. ते आधी फक्त लहान-लहान मुर्ती बनवायचे. मात्र, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं? या घटनेत आरोपी हे आपटे असले तरी मुख्य आरोपी हे त्यांना काम देणारे आहेत आणि ते ठाण्यातील आहेत. आपटेंना सुपारी कोणी दिली? आपटेंना एवढा अनुभव नसतानाही त्यांना पुतळ्याचे काम कोणी दिले नसते”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
माफी मागून असे विषय सुटतात का?
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण शिवरायांची एकदा नाही १०० वेळा माफी मागायला तयार आहोत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, “माफी मागून असे विषय सुटतात का? मग असे अनेक विषय माफी मागून सुटायला पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत माफी मागून जर विषय सुटले असते तर मग ४० गद्दारांना माफी द्यायची का? आता हे प्रकरण राज्य सरकारच्या गळ्याशी आलेलं आहे. सरकारला तोंड दाखवायला जागा नाही. मुख्यमंत्री म्हणाले की मी १०० वेळा माफी मागायला तयार, पण तुमची माफी महाराष्ट्राने स्वीकारली पाहिजे ना?”, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
शहर
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: दसऱ्यानंतर शिंदेंच्या मंत्रिमंडळात मोठी खांदेपालट! अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन तरुण आमदारांना मिळणार मंत्रिपद!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- सातारा: किल्ले प्रतापगडावर ३६७ मशालींचा भव्य 'मशाल महोत्सव'; ३६७ व्या वर्षपूर्तीनिमित्त गड उजळणार तेजोमय प्रकाशात!
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!





























Subscribe to my channel




