कर्नाटक: मंडाया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. भाजपचे तुमकूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या हिने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यावरून झालेल्या वादातून एका कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस (PSI) कथितपणे मारहाण करत कानशिलात लगावली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी 'भीम अमावस्या' (Bhimana Amavasya) सणाच्या पवित्र निमित्ताने मंडाया जिल्ह्यातील श्रीरंगपटना तालुक्यातील आरती उक्मडा येथील मारम्मा (श्री लक्ष्मी नरसिंहस्वामी) मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. याच दरम्यान आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी आणि एसीपी (ACP) अधिकारी के. सी. गौतम यांची पत्नी असलेल्या ऐश्वर्या या आपल्या दोन लहान मुलांसह आणि कुटुंबीयांसोबत दर्शनासाठी मंदिरात आल्या होत्या. व्हीआयपी (VIP) रांगेतून आलेल्या ऐश्वर्या यांनी रांगेत न थांबता थेट मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याची आणि दर्शन घेण्याची मागणी केली.
घटनास्थळावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलीस सविता बी. पाटील यांनी त्यांना रोखले. मंदिरात प्रचंड गर्दी असून एकाच वेळी सर्वांना सोडल्यास रांगेत ताटकळत उभे असलेल्या इतर भाविकांकडून आक्षेप घेतला जाऊ शकतो, त्यामुळे कृपया दोन मिनिटे प्रतीक्षा करावी, अशी विनंती महिला पीएसआय सविता यांनी केली. परंतु, ही विनंती ऐकून न घेता ऐश्वर्या संतापल्या आणि त्यांनी स्वतःची ओळख सांगत "मी आमदाराची मुलगी आहे, मला का रोखत आहात?" असे म्हणत महिला अधिकाऱ्याशी अरेरावी करण्यास सुरुवात केली.
वाद वाढत गेला आणि त्याच वेळी गणवेशात असलेल्या इन्स्पेक्टर लक्ष्मी या देखील तिथे आल्या. त्यांना गर्भगृहात का सोडले, असा जाब ऐश्वर्या यांनी विचारला. यावर पीएसआय सविता यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या ऐश्वर्या यांनी थेट महिला पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर हात उगारत गालावर जोरात थापड मारली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलीस अधिकाऱ्याची नोकरी घालवण्याची धमकीही दिली.
या प्रकारानंतर मंडाया महिला पोलीस ठाण्यात पीएसआय सविता बी. पाटील यांच्या तक्रारीवरून आरोपी ऐश्वर्या यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांनुसार सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून रोखणे, मारहाण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे यांसारख्या गुन्ह्याखाली एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. तसेच ऐश्वर्या यांच्याकडूनही पोलिसांच्या गैरवर्तनाबाबत प्रतिदूक दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर वाढता वाद आणि जनक्षोभ पाहता, भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांनी माध्यमांसमोर येत याप्रकरणी उघडपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "माझ्या मुलीने जर मंदिराजवळ कोणतेही नियम मोडले असतील किंवा तिचे वर्तन चुकीचे ठरले असेल, तर मी एक पिता म्हणून मजुरांच्या आणि जनतेच्या वतीने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. मंदिर हे शांततेचे ठिकाण आहे, तिथे असे वर्तन घडायला नको होते." सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून प्रशासनाकडून कायदेशीर पावले उचलली जात आहेत.
शहर
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



