मुंबई: महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांच्या स्थितीवरून आणि गेल्या ५ वर्षांत हजारो कंपन्या बंद पडल्याच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात मोठे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अत्यंत सविस्तर व आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सुमारे ३६ हजार खासगी कंपन्या बंद पडल्याची चिंता व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, यामागील खरी वस्तुस्थिती आणि आकडेवारी जनतेसमोर मांडली आहे.
राज्यातून उद्योग किंवा कंपन्या बंद झाल्याचा केवळ एक चुकीचा आभास निर्माण केला जात आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संसदेतील प्रश्नोत्तरांच्या प्रक्रियेत संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली जाते. मात्र, कंपन्यांबाबतचा सविस्तर आणि खरा तपशील हा केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Corporate Affairs) अधिकृत संकेतस्थळावर पूर्णपणे उपलब्ध असतो. काही राजकीय नेत्यांनी आणि माध्यमांनी संसदेतील उत्तराचा आपापल्या सोयीनुसार अर्थ काढून समाजात गैरसमज पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
या प्रकरणाची सविस्तर आकडेवारी मांडताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या कंपन्या बंद झाल्याचे दाखवले जात आहेत, त्यापैकी तब्बल ७६ टक्के कंपन्या या प्रत्यक्ष सुरूच झालेल्या नव्हत्या, म्हणजेच त्या निष्क्रिय किंवा 'डिफंक्ट' स्वरूपाच्या होत्या. प्रत्यक्ष आर्थिक उलाढाल न करणाऱ्या किंवा केवळ कागदोपत्री नोंदणी होऊन कधीही कार्यान्वित न झालेल्या अशा कंपन्यांचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रत्यक्षात चालू असलेले उद्योगधंदे बंद पडल्याचा दावा करणे धादांत खोटे आणि दिशाभूल करणारे आहे, असे ते म्हणाले.
याचबरोबर, पुण्यातील चाकण एमआयडीसीमधील काही कंपन्यांच्या स्थलांतराबाबत शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या चिंतेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र हे नेहमीच देशात उद्योगांच्या बाबतीत अग्रेसर राहिले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात क्रमांक १ वर होता आणि कायम क्रमांक १ वरच राहील. राज्यातील उद्योगांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या या मुद्द्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




