पुणे: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (COEP) मनसे नेते अमित ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान प्राचार्यांच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोंशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी तो फोटो काढायला लावला होता. त्यानंतर भाजप आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या संपूर्ण प्रकरणावर आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आणि थेट आव्हान दिले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "भिंतीवर सोडा, मी माझ्या कपाळावर इथे नरेंद्र मोदी यांचा फोटो चिकटवून फिरेल." त्यांनी पुढे भाजपवर टीकास्त्र सोडत म्हटले की, लोकांची कामे होत नाहीत, उलट फक्त पक्ष फोडणे सुरू आहे. या सगळ्या राजकारणापेक्षा रस्त्यांचे कामे सुधारा, खड्डेमुक्त रस्ते तयार करा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना संदीप देशपांडे यांनी भाजप सरकारला २०१४ मधील आश्वासनांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, भाजपने महाराष्ट्रातील सर्व शाळा चांगल्या कराव्यात, सर्व Education Sector मध्ये शिक्षक भरती करावी आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवाव्यात. २०१४ मध्ये प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, ते पैसे त्यांनी द्यावेत. तसेच तरुणांना दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, ते पूर्ण करावेत. देश विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे नेण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत, त्या पूर्ण कराव्यात. भाजपने जर या सर्व गोष्टी खरोखरच केल्या, तर मी भिंतीवर सोडा, माझ्या कपाळावर नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून फिरेन, असे सणसणीत आव्हान देशपांडे यांनी दिले.
नेमकी घटना काय घडली होती? मनसे नेते अमित ठाकरे हे पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (COEP) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी प्राचार्यांच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो शेजारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. मनसे नेते अमित ठाकरे यांनी तो फोटो काढण्यास सांगितले, त्यानंतर कार्यकर्त्यांनी तो फोटो काढला. या कृतीनंतर भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले, ज्यावरून मोठा वाद, राडा आणि तणाव निर्माण झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या वादावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील भाजयुमोच्या आक्रमक कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत कडक शब्दांत कानउघडणी केली होती.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



