
Salman Khans Firing Case : बॉलिवूड अभिनेतासलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. या आरोपींना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातच्या भूज येथून अटक केली. त्यानंतर आरोपींना मुंबईत आणण्यात आले. आज आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कोर्टाकडे आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. पण कोर्टाने निकाल राखून ठेवत नंतर आरोपींची रवानगी १० दिवसांच्या पोलिस कोठडीत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर आज किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान, मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. पण कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. थोड्यात वेळात कोर्ट आपला निकाल जाहीर केला. कोर्टाने आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
|
Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मोठी खबरदारी; अजित पवारांनीही घेतला उमेदवारी अर्ज |
या सुनावणीदरम्यान पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, याप्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सहभाग आहे. आरोपींना बिहार, हरियाणा, पंजाब आणि गुजरात तसंच उत्तर प्रदेश येथे न्यायचं आहे. या सुनावणी दरम्यान पोलिसांनी अनमोल बिष्णोईची पोस्ट कोर्टात वाचून दाखवली. तसंच गोळीबारासाठी वापरलेली पिस्तूल जप्त करायची असल्याचे देखील पोलिसांनी कोर्टात सांगितले.
आरोपी पनवेल फार्म हाऊसच्या जवळ घर भाड्याने घेऊन राहत आल्याचा पोलिसांनी कोर्टामध्ये खुलासा केला. सांताक्रुझ रेल्वे ट्रॅकजवळ आरोपींनी कपडे बदलले आणि त्याठिकाणावरून पसार झाले असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला. आरोपींनी सलमान खानच्या घरावर चार राऊंड फायरिंग केले होते. सध्या या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel




