सातारा: जिल्ह्यातील मलकापूर परिसरातील आगाशिवनगरमध्ये बिबट्या भरवस्तीत शिरल्याने मोठी खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आगाशिव डोंगरावरून खाली उतरलेला हा बिबट्या बॅकवर्ड सोसायटी आणि इंद्रप्रस्थ कॉलनी परिसरात फिरताना नागरिकांच्या निदर्शनास आला. परिसरातील काही कुत्र्यांनी या बिबट्याचा पाठलाग केल्यामुळे तो सैरावैरा पळू लागला आणि कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत असलेल्या एका मोकळ्या जागेतील बंद खोक्यात जाऊन लपला.
बिबट्या भरवस्तीत आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. गर्दीमुळे कराड-ढेबेवाडी रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वन्यजीव रक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने अत्यंत सावधानीपूर्वक आणि कौशल्याने एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याला जाळ्यात पकडले व सुरक्षितपणे जेरबंद केले.
जेरबंद करण्यात आलेला बिबट्या हा अंदाजे पाच महिन्यांचा असल्याचे वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांनी सांगितले. पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंद करून वराडे येथील वन्यजीव तपासणी केंद्रात हलवण्यात आले. या यशस्वी रेस्क्यू मोहिमेत सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, कराडच्या वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक सुनिता जाधव, दशरथ चिट्टे, तसेच कैलास सानप, प्रशांत मोहिते, भारत पाटील, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, भरत पवार, अमोल माने, बाबा भंडलकर आणि योगेश बडेकर आदी अधिकारी व रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. सध्या ऊस काढणीचा हंगाम आणि वाढत्या जंगलतोडीमुळे वन्यप्राणी सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात मानवी वस्तीत आणि नागरी भागात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
शहर
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
- मुंबई: आदिवासी आणि रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा; बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेची आक्रमक मागणी
- मुंबई: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी मध्य रेल्वे उभारणार पाच केंद्रे; वाडीबंदर, एलटीटी, पनवेल, कल्याण, इगतपुरीत प्रकल्प
- पुणे: कुंडमळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!
- नांदेड: 'हौस किंवा मजेसाठी शेतकरी टोकाचं पाऊल उचलत नाही! आमदार गायकवाडांच्या वक्तव्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर कडाडले
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!



























Subscribe to my channel




