पुणेः केशवनगर, मुंढवा भागातील 'व्यंकटेश ग्राफिटी' सोसायटीत ३३ वर्षीय विवाहितेने साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, नणंद शैली संजय सकपाळ (वय ३१, रा. ओशिवरा, अंधेरी, मुंबई) हिला मुंबईतून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिष्णा बाळकृष्ण निकम (सासरचे नावः त्रिष्णा राहुल सकपाळ, वय ३३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील बाळकृष्ण जयराम निकम (वय ७४, रा. मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजीसासू शकुंतला साळुंके यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०८, ८५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
छळ, फ्लॅटची मागणी आणि घटस्फोटासाठी दबाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ पासून मृत त्रिष्णा हिला सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांसाठी, फ्लॅट खरेदी करण्यासाठी तसेच तिच्या वडिलांच्या नावावर असलेला व्यंकटेश ग्राफिटीमधील फ्लॅट नावावर करून देण्यासाठी त्रास दिला जात होता. पती राहुल याचे दुसरे लग्न करायचे असल्याने तिच्यावर घटस्फोट देण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता. तसेच नणंदेच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला जात होता. सासरच्यांच्या सततच्या शारीरिक, मानसिक त्रासाला आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळून त्रिष्णा हिने २९ सप्टेंबर २०२६ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनास्थळी सुसाईड नोट जप्त
आत्महत्येपूर्वी त्रिष्णा निकम हिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने पतीसह सासरच्या सर्व आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आणि तिच्या मृत्यूला तेच जबाबदार असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट असलेली वही, साडीचे तुकडे, चाकू, पेन, दोन लॅपटॉप आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे. मृत महिलेच्या मोबाईलमध्ये आरोपींसोबत झालेल्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना आढळून आले आहे.
नणंदेला ट्रान्झिट रिमांडवर पुण्यात आणले
मुंढवा पोलिसांनी आरोपी नणंद शैली सकपाळ हिला ३ ऑक्टोबर रोजी मुंबईतील अंधेरी येथून अटक केली. अंधेरी रेल्वे मोबाईल कोर्टाकडून तिचा ट्रान्झिट रिमांड मिळवून तिला पुण्यात आणण्यात आले आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध घेणे, आर्थिक व्यवहारांचा तपास करणे आणि आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी शैली सकपाळ हिची ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर यांनी न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर केला आहे. मुंढवा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहर
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
- नाशिक: मालेगाव तालुक्याच्या घशाला पडली कोरड; १२५ गावे आणि ५८ वाड्यांना पाणीटंचाईची तीव्र धग
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव
- सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ९७.९२ टक्के चुरशीने मतदान! खंडाळ्यात तुफान राडा, उद्या निघणार निकाल
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा



























Subscribe to my channel




