
Pune : ‘पुराचे पाणी शिरल्याने घरात सगळा चिखल झाला असून, आता पुन्हा सगळा संसार उभा करण्याशिवाय पर्याय नाही. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गृहोपयोगी वस्तू नव्याने घ्याव्या लागतील किंवा त्यांची दुरुस्ती करावी लागेल,’ कुटुंबियांसोबत घरात साचलेला चिखल काढताना अनिकेत गरूड सांगत होते; तर पुराच्या पाण्यामुळे किराणा दुकानातील सर्व वाण सामान, साहित्य भिजल्याने झालेल्या नुकसानाचा हिशोब करताना हताश झालेले नारायण प्रजापतीही ‘आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल,’ असे म्हणत होते...
मुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडलेल्या विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, निंबज नगर, विठ्ठल नगर परिसरातील नदीकाठच्या अनेक सोसायट्या, अपार्टमेंटमध्ये मध्यरात्रीपासून पाणी साचण्यास सुरुवात झाली. पहाटेपर्यंत तळमजल्यावर असलेल्या सदनिका आणि पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने स्थानिक रहिवाशांची झोप उडाली. ‘पहाटे तीन वाजता पाणी शिरू लागले अन् पाहता पाहता पार्किंगमध्ये पाणीपातळी छातीपर्यंत वाढली. मध्यरात्रीपासूनच वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे मोबाइलही ‘डिस्चार्ज’ आहे. वाहने अगोदरच लांब चौकात लावून ठेवल्याने वाचली,’ अशी ‘आपबीती’ श्रीगणेश अपार्टमेंटमध्ये राहणारे सुनील चव्हाण सांगत होते.
|
|
‘रात्रीपासून गेली वीज’
‘एकतानगरीतील इमारतीत पहिल्या मजल्यावर मी राहतो. रात्री दोन वाजल्यापासून वीज गेली. त्यानंतर लोकांचा आरडाओरडा ऐकू येत होता. पहाटेपर्यंत पार्किंगमध्ये गुडघ्याएवढे पाणी साचले. कुटुंबीय गावाला गेले असल्याने घरी मी एकटाच होतो. बचावकार्य करणाऱ्यांनी मला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. जनता वसाहतीत माझा दवाखाना असून, आता तिथेच मुक्काम करणार आहे,’ असे डॉ. कैलास चरखा यांनी सांगितले.
बोटीने सुरक्षितस्थळी आणले
पुणे महापालिका व ‘पीएमआरडीए’चे अग्निशमन दल, ‘एनडीआरएफ’, लष्कराच्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी नागरिकांच्या बचावासाठी एकतानगरी परिसरात तातडीने धाव घेतली. पाणी शिरलेल्या सोसायट्यांमध्ये अडकलेले ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना बोटीने सुरक्षित ठिकाणी आणले. शिवपुष्प पार्क चौकापासून एकतानगरीकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती.
‘प्रशासनाने ‘अलर्ट’ दिलाच नाही’
आनंद पार्क सोसायटीत राहणाऱ्या स्नेहल केसकर यांनी, प्रशासनाने आधीच माहिती न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही पहाटे साडेतीनपासून जागेच आहोत. पाणी शिरायला सुरुवात झाल्यावर सर्वप्रथम वाहने पार्किंगमधून काढून वरच्या चौकात लावली. साडेपाचच्या सुमारास जिन्यात पाणी आले. घरापासून अवघ्या पाच पायऱ्यांवर पाणी होते. संसारोपयोगी वस्तू कशा सांभाळायच्या, अशी चिंता सतावू लागली. धरणातून विसर्ग करताना पाणी शिरणार असेल, तर प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा दिला जातो. या वेळी काहीच सांगितले नाही. त्यामुळे अनेकांची धावपळ झाली,’ असे त्या म्हणाल्या. त्यावर ‘अग्निशमन दलाचे जवान वगळता महापालिका प्रशासन व अन्य आपत्ती यंत्रणा मदतीला आल्या नाहीत,’ असे वैभव काणेकर यांनी सांगितले.
तरुणांचे प्रसंगावधान
एकता नगर परिसरात पुराचे पाणी शिरल्याने अनेक जण अडकले होते. त्यांना सुखरूप ठिकाणी जाता यावे, यासाठी अनेक जण प्रयत्न करीत होते. सनसिटी रस्ता परिसरातील अजय शितोळे आणि त्याच्या मित्रांनी परिसरातील झाड आणि खांबांना दोरी बांधून पाण्यातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात दिला.
चहा, दूधपिशव्या, मेणबत्त्यांचे वाटप
मुसळधार पावसात गुडघाभर साचलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढत योगेश डांगरे हातातील पिशव्यांमध्ये असलेल्या थर्मासमधून बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कागदी कपात गरम चहा देत होते. ‘मी जवळच्या साईटेरेस सोसायटीत राहतो. नदीचे पाणी अचानक शिरल्याने आसपासच्या सोसायट्यांतील रहिवाशांना पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यांच्या सुटकेसाठी महापालिका व पोलिसांसह विविध सरकारी यंत्रणांचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. बचाव व मदतकार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना घोटभर चहा देण्यासाठी मी येथे आलो आहे,’ असे ते सांगत असताना बचाव कार्य कर्मचारी त्यांच्या हातातून चहाचा कप घेत धन्यवाद देत होते. ‘महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीही हातात दूधाच्या पिशव्या आणि बिस्किटांचे पुडे वाटत होते. पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने घरात अडकलेल्या लोकांनी खिडकीतून दोरी लावून पिशव्या सोडल्या होत्या. त्यात दूध पिशव्या आणि बिस्किटांचे पुडे ठेवत आहोत,’ असे कर्मचारी गणेश सकट यांनी सांगितले. अनेक घरांमध्ये अंधार असल्याने नाश्ता व मेणबत्त्यांचेही वाटप करण्यात आले.
पहाटेच्या वेळेला पावसाचा, पाण्याचा आवाज येत होता. त्याच्या जोडीला लोकांचा आरडाओरडाही ऐकू येत होता. त्यामुळे काहीतरी संकट आल्याचा अंदाज आला. खिडकीतून पाहिल्यावर पाणी दिसले. त्यामुळे लोकांच्या मदतीसाठी जावे, या विचाराने इमारतीखाली आलो. मात्र, खाली आल्यावर माझी जीवनवाहिनी, भाजी विक्रीची हातगाडीच वाहून जात असल्याचे दिसले. त्यामुळे जिवाच्या आकांताने पाण्यातून पळत जाऊन हातगाडीपर्यंत पोहोचलो. छातीएवढ्या पाण्यातून हातगाडी पुन्हा घेऊन आलो. हातगाडी सुखरूप बाहेर काढल्याने जिवात जीव आला.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
महाराष्ट्र
- नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!



























Subscribe to my channel




