पुणे: पुण्यातील प्रसिद्ध गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे महागडे सोन्याचे दागिने आणि मोबाईल संच लांबवणाऱ्या एका आंतरराज्यीय अट्टल टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तब्बल ४,६०० किलोमीटरचा प्रवास आणि पाठलाग करून गुजरात व हरियाणा पोलिसांच्या मदतीने हरियाणातील पलवल भागातून तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून १३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली आलिशान कार असा एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
४,६०० किलोमीटरचा थरारक पाठलाग
गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणूक आणि देखावे पाहण्यासाठी आलेल्या हजारो भाविकांचे सोन्याचे दागिने व मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप आणि त्यांच्या पथकाने परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि तांत्रिक विश्लेषणाचा (Technical Analysis) आधार घेतला.
तपासादरम्यान पोलिसांना सुगावा लागला की, ही टोळी लक्झरी कारने पुण्यात आली होती आणि चोरी करून थेट परराज्यात पसार झाली आहे. यातील एक आरोपी गुजरातमधील अरवली येथे दाखल गुन्ह्यात पकडला गेल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुजरात ते हरियाणा असा तब्बल साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करून पलवल (हरियाणा) येथील गावात छापा टाकला आणि तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी
-
अजय समशेर ऊर्फ विनोदकुमार रूपसिंग कोळी (वय २०, रा. समसाबाद, पलवल, हरियाणा)
-
अमन समशेर ऊर्फ अनिलकुमार नारायणसिंग कोळी (वय २४, रा. आदर्श कॉलनी, पलवल, हरियाणा)
-
दीपक समशेर ऊर्फ राजूभाई सापसिंग (वय २१, रा. हिरानगर कॉलनी, पलवल, हरियाणा)
पोलीस तपासात या टोळीने गणेशोत्सवात गर्दीचा गैरफायदा घेऊन एकापाठोपाठ एक चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. विश्रामबाग पोलिसांच्या या धडक आणि धाडसी कारवाईमुळे पुणे पोलीस दलाचे कौतुक होत आहे.
शहर
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!



























Subscribe to my channel



