
Pune : पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरलेला एक तरुण धावताना अचानक कोसळला आणि काही क्षणांतच सगळं संपलं. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज शनिवारी सकाळी अतिशय हृदयद्रावक आणि हळहळ व्यक्त करायला लावणारी घटना घडली. पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असं या मृत तरुणाचं नाव आहे.
नेमकी घटना काय?
पुणे शहरात गेल्या महिन्याभरापासून पोलीस भरतीची प्रक्रिया जोरात सुरू आहे. विविध टप्प्यांमधून उमेदवार जात असताना सध्या मैदानी चाचण्यांचा टप्पा सुरू आहे. शिवाजीनगरच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कारागृह पोलीस भरतीसाठी उमेदवारांची चाचणी घेतली जात होती. आज शनिवारी सकाळी वातावरणही थोडं तणावपूर्ण होतं. सगळे उमेदवार आपापल्या परीने चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करत होते. पुरुषोत्तमही त्याच जिद्दीने १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत उतरला होता. ही चाचणी तशी कठीणच मानली जाते आणि अनेकांसाठी निर्णायकही ठरते. पुरुषोत्तमने दमदार सुरुवात करत एकामागून एक तीन फेऱ्या पूर्ण केल्या. मात्र, चौथ्या फेरीत धावत असताना अचानक त्याला अपस्माराचा झटका (फिट) आला. काही कळायच्या आत तो थेट मैदानावर कोसळला. हे पाहताच इतर उमेदवार घाबरले आणि त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना आवाज दिला.
हृदयाचे ठोके मंदावले
घटनास्थळी उपस्थित असलेले अधिकारी आणि कर्मचारी लगेच धावून आले. मैदानावरच तैनात असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी त्याचे हृदयाचे ठोके मंदावल्याचं आढळलं, त्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं स्पष्ट झालं. क्षणाचाही विलंब न लावता त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. ही बातमी समजताच भरती प्रक्रियेत उपस्थित असलेल्या सर्वांवर शोककळा पसरली.
पुरुषोत्तम हा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील रहिवासी होता. पोलीस होण्याचं मोठं स्वप्न घेऊन तो या भरतीत सहभागी झाला होता आणि त्यासाठी त्याने मेहनतही घेतली होती. मात्र, नियतीने वेगळंच काहीतरी ठरवलं आणि त्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिली
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel





Drive sales and watch your affiliate earnings soar!