
Pune : नांदेड - पुणे एक्सप्रेस सह हरंगुळ (लातूर) - पुणे स्पेशल ही रेल्वे मराठवाड्यातून येणाऱ्या विविध रेल्वे पुणे जंक्शनऐवजी हडपसर स्थानकावर थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 26 जानेवारीपासून लागू केला जाणार आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय हेाणार आहे. या निर्णयाविरोधात रेल्वे संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात थांबा नसल्याने प्रवाशांना हडपसरमध्ये त्रास
नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसर येथे पहाटे 4.30 वाजता पोहोचते. यावेळी त्या परिसरात कोणतीही पुणे महानगर पालिकेची बस सेवा नाही. त्याच बरोबर खासगी वाहने अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, स्वारगेट, मनपा, खराडी याठिकाणी जाण्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होणार आहे. याचा फटका वृद्ध, महिला, विद्यार्थी आणि दररोज पुण्यात नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या शेकडो मराठवाड्यातील प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.
|
Pune Accident : हडपसरमध्ये 20 वर्षांच्या आदित्यचा दुर्दैवी मृत्यू, बसने पेट्रोल भरतानाच उडवले |
मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या अनेक रेल्वे 26 जानेवारीनंतर हडपसरपर्यंतच धावणार आहे. तत्कालीन रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या काळात नांदेड हडपसर ही रेल्वे चालवण्यात आली होती. ही रेल्वे हडपसरपर्यंत चालवल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत होती. यानंतर श्री दानवे यांनी ही रेल्वे पुण्यापर्यंत नेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली. या नंतर ही रेल्वे नांदेड ते पुणे अशी धावत आहेत.
दरम्यान पुणे रेल्वे स्टेशनचे काम सुरू होणार आहे. यामुळे पुणे स्टेशन येथे थांबणाऱ्या रेल्वे अन्य रेल्वे स्टेशनवर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यात नांदेड ते पुणे सह अन्य रेल्वेचाही समावेश आहे. नांदेड पुणे सह मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे पुण्याला थांबण्याची व्यवस्था करण्यात आली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा मराठवाड्यातील संघटनांकडून देण्यात आला आहे.
गुजरातसह उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचं व्हावं. यासाठी गुजरात आणि उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेला पुण्यात थांबण्याची व्यवस्था आहे. मात्र, मराठवाड्यातून आलेल्या जागा नाही, असे कारण दिले जाते. मराठवाड्यातील रेल्वे प्रवासी संघटनांना गुजरातसह उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेला हरंगुळपासून जेजुरीपर्यंत थांबण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel



1 thought on “Pune : मराठवाड्यातून पुण्याकडे येणाऱ्या अनेक रेल्वे हडपसरपर्यंतच; 26 जानेवारीपासून बदल लागू, विद्यार्थी–नोकरदारांना मोठा फटका”