.
Asia Cup finals : भारत-पाकिस्तान एशिया कप 2025 च्या रोमांचक अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एक मोठा निर्णय घेतला. आशियाई क्रिकेट परिषद (ACC)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे प्रभावशाली नेते मोहसिन नकवी यांच्या विरोधात टीम इंडियाने स्पष्ट भूमिका घेतली
फायनल सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने त्यांच्याकडून एशिया कपची विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. या घटनेमुळे मैदानावर जवळपास दोन तास नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली. अखेर नकवी तेथून निघून गेले आणि ट्रॉफी आणि पदकंही कोणी तरी घेऊन गेलं.
BCCI ने लावले गंभीर आरोप
या सर्व प्रकरणानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की, मोहसिन नकवी यांनी फक्त ट्रॉफीच नाही, तर भारतीय खेळाडूंसाठी ठेवलेली पदकंही बरोबर घेतली. बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणाचा मुद्दा पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीत औपचारिकपणे मांडला जाईल.
ट्रॉफी आणि पदकं भारताला परत द्यावीत
देवजीत सैकिया यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं, “आम्ही एसीसी अध्यक्षाकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. याचं कारण म्हणजे ते पाकिस्तानमधील एक प्रमुख राजकीय नेते आहेत. मात्र याचा अर्थ असा अजिबात नव्हता की, ते ट्रॉफी आणि पदकं स्वतःसोबत घेऊन जातील. ही अतिशय खेदजनक आणि अन्यायकारक गोष्ट आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ट्रॉफी आणि पदकं शक्य तितक्या लवकर भारताला परत दिली जातील. याविरोधात आम्ही नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ICC परिषदेत औपचारिक निषेध नोंदवणार आहोत.”
याहून चांगला प्रत्युत्तराचा क्षण असू शकत नाही
सैकिया पुढे म्हणाले, “भारतीय सैन्याने सीमेवर ज्या धाडसी कारवाया केल्या आहेत, त्याचाच एक प्रकारचा प्रतिध्वनी आता दुबईत झाला आहे. त्यामुळे हा क्षण भारतीय क्रिकेटसाठी अतिशय अभिमानाचा आहे. पूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ झालं होतं आणि आता ‘ऑपरेशन किल्ला’ यशस्वी झालं. काही देशांनी केलेल्या हास्यास्पद कृत्यांना हे एक जोरदार प्रत्युत्तर आहे. त्यामुळे दुबईतील अंतिम सामन्याच्या त्या भव्य क्षणी याहून चांगलं उत्तर असूच शकत नव्हतं.”
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यामागचं कारण स्पष्ट
सैकिया यांनी पुढे सांगितलं की बीसीसीआय नेहमीच भारत सरकारच्या धोरणानुसार, पावलं उचलतं. “भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 12-15 वर्षांपासून कोणतेही द्विपक्षीय सामने झालेले नाहीत आणि ही भूमिका कायम ठेवली आहे. मात्र सरकारने स्पष्ट धोरण आखलं आहे की, बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मग ते क्रिकेट असो किंवा फुटबॉल भारताला सहभागी व्हावंच लागतं. अन्यथा आंतरराष्ट्रीय महासंघांकडून संबंधित राष्ट्रीय संघटनांवर बंदी घालण्यात येऊ शकते. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलो,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




