पुणे: पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (१९ ऑगस्ट) ग्रामस्थांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. पीडित मुलीला न्याय मिळावा, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित आदिवासी कुटुंबाचे पुनर्वसन करून शासनाकडून आवश्यक मदत मिळावी, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. या निषेधार्थ पिंपळवंडी गावही बंद ठेवण्यात आले होते. सकाळी दहाच्या सुमारास ग्रामस्थ महामार्गावर मोठ्या संख्येने जमले. 'आमच्या मुलीला न्याय द्या', 'आरोपीला कठोर शिक्षा द्या', अशा घोषणा देत आंदोलकांनी घटनेचा तीव्र निषेध केला. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनात संगमनेर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश काकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, माजी पंचायत समिती सभापती संगीता वाघ, सरपंच मेघा काकडे, सुप्रिया लेंडे, मोनाली खोंड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले. रास्ता रोकोमुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम घनटे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
आंदोलकांनी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली. त्यानंतर महसूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी ग्रामस्थ व पीडित कुटुंबीयांना शासनाकडून योग्य ती मदत आणि आवश्यक सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर परिस्थिती निवळण्यास सुरुवात झाली. घटनेमुळे पिंपळवंडी तसेच परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून, पीडित कुटुंबाला न्याय आणि पुनर्वसन मिळावे, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!























Subscribe to my channel




