कोल्हापूर: साने गुरुजी वसाहत परिसरातील सर्वे कॉलनीतील महादेव मंदिरासमोर चालू इलेक्ट्रिक बाईक पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. बाईकवरील महिलेने तत्काळ गाडीवरून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. येथील धीरज विकास भुरे यांच्या मालकीची इलेक्ट्रिक बाईक त्यांच्या पत्नी प्राची भुरे या कामानिमित्त बाहेर घेऊन गेल्या होत्या. घराकडे जाताना रात्री पावणे आठच्या सुमारास अचानक गाडीतून धूर येऊ लागल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला बाईक थांबवली. काही क्षणातच दुचाकीने मोठा पेट घेतला.
नागरिकांनी महानगरपालिका अग्निशमन दलास पाचारण केले. जवानांनी तातडीने तेथे येऊन पाणी मारून आग आटोक्यात आणली. या मोपेडमध्ये एक मोबाइल व ३० हजार रुपयांची रोकड होती. यात धीरज भुरे यांचे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले.भुरे यांनी तीन महिन्यांपूर्वी ही दुचाकी खरेदी केली होती. चालू दुचाकीला नेमकी कशामुळे आग लागली याचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत मोपेड जळून आगीचे लोट उसळले होते. चालक देवानंद कांबळे, फायरमन गिरीश गवळी व श्रीधर चाचे यांनी ही आग विझवली. दरम्यान जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने तेथे आले, त्यांनी मोपेड मालकाकडे चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.
काही मिनिटात खाक
या दुचाकीला आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ती पूर्णपणे जळून खाक झाली. आगीचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. नेमकी कोणत्या भागात आग लागली हे पाहण्यासाठी नागरिकांनी राधानगरी रस्त्यावर गर्दी केली होती.
शहर
- पुणे: पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र संपन्न; विद्यार्थ्यांनी घेतले डिजिटल सुरक्षेचे धडे!
- नागपुर: मनीषनगरातील हॉटेलच्या रूममध्ये तरुणीची चाकूने भोसकून हत्या, तरुण गंभीर जखमी!
- पुणे: राहूजवळ हृदयद्रावक घटना! विजेच्या धक्क्याने दोन चुलत भावांचा मृत्यू, परिसरात शोककळा
- पुणे: १ सप्टेंबरला ओबीसींचे शक्तिप्रदर्शन! लक्ष्मण हाकेंची ‘चलो मुंबई’ची हाक; सरकारला दिला थेट इशारा
महाराष्ट्र
- पुणे: पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र संपन्न; विद्यार्थ्यांनी घेतले डिजिटल सुरक्षेचे धडे!
- नागपुर: मनीषनगरातील हॉटेलच्या रूममध्ये तरुणीची चाकूने भोसकून हत्या, तरुण गंभीर जखमी!
- पुणे: राहूजवळ हृदयद्रावक घटना! विजेच्या धक्क्याने दोन चुलत भावांचा मृत्यू, परिसरात शोककळा
- पुणे: १ सप्टेंबरला ओबीसींचे शक्तिप्रदर्शन! लक्ष्मण हाकेंची ‘चलो मुंबई’ची हाक; सरकारला दिला थेट इशारा
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन

























Subscribe to my channel



