
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले आहेत. अजित पवारांच्या या निर्णयामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला.
रविवारी झालेल्या अभूतपूर्व राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कराडमध्ये शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला भेट देत शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संघर्षाच्या काळात पक्षासाठी बाप-बेटे मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कालपासून मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. जयंत पाटील मुंबई येथे थांबून सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवत आहेत आणि येणाऱ्या काळाची व्यूहरचना आखत आहेत. तर त्यांचे पुत्र प्रतीक पाटील हे शरद पवार यांच्या समर्थनार्थ कराडमध्ये आले आहेत. शरद पवार यांच्यासह कराड येथे आमदार रोहित पवार,आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित आहेत.
|
Mumbai Heavy Rain : घाटकोपरमध्ये घर कोसळून ४ जखमी; ठाण्यात ३५ फुटांची भिंत चाळीवर कोसळली |
शरद पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या प्रवृत्तीना त्यांची जागा दाखवून देवू. काही समाज विघातक प्रवृत्तीकडून महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका घेतली जात आहे. त्याला तुमचे माझे सहकारी बळी पडले आहेत. परंतु सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील, पण महाराष्ट्राची शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. तसेच या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही', अशा शब्दात शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यांनी सरकारमध्ये सहभागी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. अजित पवारांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तर अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




