
Pune News : मिळकतकराची गमावलेली ४० टक्क्यांची सवलत पुन्हा मिळविण्यासाठी ‘पीटी ३’ आज (ता. १४) शेवटचा दिवस असल्याने क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. अनेक नागरिक रांगेत थांबूनही त्यांना अर्ज दाखल करता आला नाही.
अखेर महापालिका प्रशासनाने नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी ‘पीटी ३’ अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता. १६) लेखी आदेश काढण्यात येतील.
|
|
राज्य सरकारने पुणेकरांना लागू असलेली १९७० पासूनची मिळकतकराची ४० टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पहिल्या टप्प्यात ज्या नागरिकांचे दोन फ्लॅट आहेत किंवा भाडेकरू ठेवले आहेत अशा ९७ हजार मिळकतींचा समावेश करून २०१९ ते २०२२ या तीन वर्षातील वसुली सुरु केली.
तसेच २०१९ पासून नव्याने नोंदणी झालेल्या मिळकतींची सवलत काढून घेतली आहे. त्यामुळे अव्वाच्या सव्वा बिल आल्याने नागरिकांचे धाबे दणाणले. यास प्रचंड विरोध झाल्याने अखेर राज्य सरकारने ४० टक्के सवलत पुन्हा देण्याचा निर्णय घेतला.
ही सवलत पुन्हा घेण्यासाठी सदनिकेचे पुरावे आणि पीटी ३ अर्ज भरून जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात नेऊन देणे आवश्यक आहे. त्यासाठीची १४ नोव्हेंबर ही अंतिम उद्या संपणार असताना या दिवशी दिवाळी पाडव्याची सुट्टी असल्याने या दिवशी महापालिकेतर्फे अर्ज स्वीकारले जाणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नव्हती.
जर अर्ज भरला नाही तर ४० टक्के सवलत गमविण्याच्या धास्तीने अनेक नागरिकांनी शहरातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये धाव घेतली होती. सकाळपासून ‘पीटी ३’ अर्ज भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या.
दुपारनंतरही रांगा कमी झाल्या नाहीत. अखेर चार नंतर क्षेत्रीय कार्यालयांनी नागरिकांना टोकन देऊन अर्ज भरण्यासाठी येण्यास सांगितले. दरम्यान, अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी अनेकांनी प्रशासनाकडे केली होती. अखेर महापालिका प्रशासनाने आज सायंकाळी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.
तर उपायुक्त अजित देशमुख म्हणाले, ‘‘आयुक्तांसोबत चर्चा करून पीटी ३’ अर्ज सादर करण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश १६ नोव्हेंबर रोजी काढले जातील.’’
केवळ ७९ हजार अर्ज दाखल
मिळकतकराची ४० टक्के सवलत ही केवळ ज्यांची एक सदनिका आहे त्यांना मिळणार आहे. दुसऱ्या सदनिकेला १०० टक्के कर आकारणी केली जाईल. सध्या शहरातील जुन्या ९७ हजार ५०० आणि २०१९ नंतर नव्याने नोंदणी झालेल्या १ लाख ६५ हजार अशा एकूण २ लाख ६४ हजार ५०० मिळकतींना १०० टक्क कर लागू झाला आहे.
त्यांना सवलत मिळविण्यासाठी दोन पुराव्यांसह पीटी ३ अर्ज सादर करणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत सुमारे ७८ हजार ९३८ जणांनी अर्ज भरले आहेत. अद्यापही १ लाख ८६ हजार ५६२ मिळकतधारकांनी अर्ज भरलेले नाहीत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. दरम्यान जे मिळतकधारक अर्ज भरणार नाहीत, त्यांना सवलत मिळणार नाही.
४० टक्के सवलतीसाठी हे पुरावे आवश्यक (कोणतेही दोन)
-‘पीटी ३’ अर्जासोबत मिळकतीचा वापर स्वतः राहण्यासाठी करत असल्याचे सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र
- मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅस कार्ड, रेशनकार्ड आदी
- अर्ज सादर करताना त्यासोबत २५ रुपये चलन शुल्क
- पीटी ३ अर्ज महापालिकेच्या कार्यालयांसह propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




