पुणे: आळंदीत पालखी सोहळ्यादरम्यान महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा; वाहतूक बंदीवरून पोलिसांशी वादाचा व्हिडिओ व्हायरल

पुणे: आषाढी वारीनिमित्त सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आळंदी येथे एका महिलेने केलेल्या हायव्होल्टेज ड्राम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला होता. याच कारणावरून संबंधित महिलेने संताप व्यक्त करत पोलिसांशी वाद घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी काही रस्ते तात्पुरते बंद केले होते. मात्र, याच निर्णयावरून संबंधित महिला आक्रमक झाली. पोलिसांशी तिचा शाब्दिक वाद झाला आणि काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती शांततेत हाताळत वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवले. पालखी सोहळा कोणताही अनुचित प्रकार न घडता पुढे सुरू राहिला. व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, नागरिकांकडूनही यावर मतप्रदर्शन केले जात आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *