अमरावती: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अमरावती शहरात एक प्रचंड आणि आक्रमक 'आक्रोश मोर्चा' काढला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी पंचवटी चौकातून एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने भव्य मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे होती आणि संपूर्ण परिसर "महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुर्दाबाद" तसेच "तानाशाही चालणार नाही" यांसारख्या जोरदार घोषणाबाजीने दुमदुमून गेला होता.
शेतकरी व सामान्य कुटुंबातील मुलांची व्यथा या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपली तीव्र वेदना आणि चीड व्यक्त केली. आंदोलक विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली व्यथा मांडताना सांगितले की, "अतिशय गरीब आणि शेतकरी कुटुंबातील पालक स्वतः अर्धपोटी राहून, प्रसंगी कर्ज काढून शहरामध्ये मुलांना उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पैसे पाठवतात. विद्यार्थी दिवस-रात्र एक करून प्रचंड मेहनत करतात. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर पेपर फुटतो आणि विद्यार्थ्यांचे वर्षानुवर्षे केलेले परिश्रम व स्वप्ने मातीमोल होतात." परीक्षा पद्धतीतील वारंवार होणारे प्रयोग, तांत्रिक बिघाड आणि पारदर्शकतेचा अभाव यावर विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अमरावतीत निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर विद्यार्थ्यांनी तिथे जोरदार ठिय्या मांडला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये पेपरफुटी झाल्याचे गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण शाखेने (CID) चौकशी करून आपला अहवाल 'एमपीएससी'ला सादर केला आहे. या अहवालात पेपरफुटी झाल्याचे स्पष्ट निष्कर्ष नोंदवण्यात आल्यामुळे अखेर एमपीएससीला ती परीक्षा रद्द करावी लागली होती.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमधील रोष अनावर झाला असून, या संपूर्ण गैरप्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून एमपीएससीच्या अध्यक्षांनी तात्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे, अशी ठाम व आक्रमक मागणी मोर्चेकऱ्यांनी लावून धरली. तसेच परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी आणि या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जर शासनाने आणि संबंधित प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर अमरावतीत पेटलेली ही आंदोलनाची ठिणगी संपूर्ण महाराष्ट्रात पसरून एक व्यापक विद्यार्थी लढा उभारला जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी विद्यार्थी नेत्यांनी आणि आंदोलकांनी दिला. गल्ली ते दिल्लीपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या यंत्रणांविरुद्धचा हा लढा असाच सुरू राहील, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या मोठ्या आंदोलनामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




