
Pune : पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत हिंजवडी फेज-एकमध्ये एका सोसायटीतील सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड करून उत्पादन घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार खडकी पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणात पाच उच्चशिक्षित तरुणांना अटक करण्यात आली असून अमली पदार्थ तस्करीची साखळी उलगडताना पुण्यासह पिंपरी, मुंबई आणि गोवा येथे कारवाई करीत सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
तुषार चेतन वर्मा (वय २१, सध्या रा. सूस), सुमीत संतोष डेडवाल (वय २५, रा. सांगवी), अक्षय सुखलाल महेर (वय २५, रा. हिंजवडी), मलय राजेश डेलीवाला (वय २८, रा. घाटकोपर, मुंबई) आणि स्वराज अनंत भोसले (वय २८, रा. कुर्ला, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील वर्मा हा नामांकित खासगी महाविद्यालयातून एमबीएचे शिक्षण घेत आहे. स्वराज भोसलेने अभियांत्रिकीची पदवी घेतलेली आहे. डेडवाल आणि महेर यांचे एमबीएचे शिक्षण झालेले आहे.
|
|
आरोपी तुषार वर्मा अमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतरपोलिसांनी खडकी परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत वर्माने सुमीत डेडवाल आणि अक्षय महेर यांच्यासह पिंपरीतील सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पिंपरीत छापा टाकला. हिंजवडी येथे एका भाडेतत्त्वावरील सदनिकेत डेडवाल आणि महेर राहत होते. तेथे अत्याधुनिक पद्धतीने हायड्रोपोनिक गांजाची लागवड करण्यात येत असल्याची माहिती छाप्यादरम्यान उघड झाली. पोलिसांनी हायड्रोपोनिक गांजा तसेच लागवडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. या कारवाईनंतर मिळालेल्या माहितीनुसार पुणे, पिंपरीसह मुंबई आणि गोव्यातही छापे टाकण्यात आले.
या कारवाईत मेफेड्रोन, ओझीकुश (हायड्रोपोनिक गांजा), चरस, एलएसडी स्टॅम्पसह विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
या प्रकरणातील मुख्य तस्कर मलय डेलीवाला आणि त्याचा साथीदार स्वराज भोसले यांना मुंबईतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यात छापे टाकून सुमारे तीन कोटी ४५ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या बँक खात्यातील सात लाख ८० हजार रुपयांची रक्कम गोठविण्यात आली.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!

























Subscribe to my channel




