
Pune : ‘पर्यावरणाचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता निर्माण व्हायला हवी. पर्यावरण संवर्धनासाठी योग्य पावले न उचलल्यास मनुष्यजातीचा अंत समीप आहे,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी बुधवारी व्यक्त केले.
किर्लोस्कर वसुंधरा फाउंडेशनतर्फे आयोजित ‘किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, किर्लोस्कर समूहाचे मनुष्यबळ विकास अधिकारी असीम श्रीवास्तव, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष आर. आर. देशपांडे, संयोजक वीरेंद्र चित्राव यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक डॉ. सुरेश मिजार, अर्किटेक्ट यतीन मोघे आणि अर्किटेक्ट सरिता झांबरे, सुवर्णा भांबूरकर, अर्जुन नाटेकर, तुषार सरोदे आदी या वेळी उपस्थित होते.
याच कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड डी. एस. कदम सायन्स कॉलेजने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक राजकोट येथील आत्मीय युनिव्हर्सिटीने, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक नाशिक येथील पी. व्ही. जी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड एस. एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने पटकावले.
|
Pune : स्वारगेटसह उपमुख्यमंत्र्यांच्या बारामती बस स्थानकात सुरक्षेचा अभाव |
कर्नाटकातील होसपेट येथील श्री गवीसिद्धेशवरा डिग्री कॉलेज, पिंपरी – चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर येथील डी. डी. टी. एस. मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, अहमदाबाद येथील सिल्व्हर ओक युनिव्हर्सिटी आणि खडकी येथील टिकाराम जगन्नाथ कॉलेज यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
डॉ. आगाशे म्हणाले, ‘पर्यावरणासंदर्भात विद्यार्थीदशेमध्ये संवेदनशीलता वाढवता आल्यास ते विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक होतील. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाटक, लघुपट ही माध्यमे यासाठी अत्यंत प्रभावी माध्यमे ठरू शकतात.’
‘सगळ्या जगात पर्यावरणाचे असंतुलन ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, पर्यावरण संवर्धनासाठी तरुण मुले अधिक प्रयत्नशील दिसतात. त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य आहे. हे आशादायी चित्र असले, तरीही पर्यावरण वाचायचे असेल, तर युवकांनी पर्यावरणीय दूत होण्याचा निर्धार केला पाहिजे,’ अशी अपेक्षा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. त्रिवेणी माथूर यांनी सूत्रसंचालन केले.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



