
Pune : राजकीय पक्षांच्या राजकारणाचा मतदारांनाच उबग आला की, नेत्यांचे एक वाक्य ठरलेले असते, ‘आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो.’ म्हणजे सर्व काही समाजासाठी करत असल्याचे ते दाखवून देतात. मतदारांना रुचणार नाही, असा निर्णय घेतला की, ‘राजकारण आणि प्रेमात सर्व काही माफ असते’ असले वाक्य फेकले की, मतदार काही बोलत नाहीत. सद्या:स्थितीतील राजकीय पक्षांच्या या सोयीच्या राजकारणात आदर्श समाजसेवक, राजकारणी कसे असतात, याचा वास्तुपाठ पुण्यात पूर्वसुरींनी घालून दिला आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करताना राजकीय पक्षांनी आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांनी आपल्या पूर्वसुरींनी दाखवून दिलेल्या मार्गांची आठवण ठेवली, तरी पुरेशी आहे.
पुण्याच्या राजकारणाला एक गौरवशाली परंपरा आहे. त्याचे स्मरण राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. राजकारणात नैतिकतेची घसरण सुरू असताना पुण्याचे नेतृत्व किती महान व्यक्तींनी केले आहे, याची आठवण राजकारण्यांनी ठेवण्याची आता वेळ आली आहे. त्या पूर्वसुरींचे स्मरण ठेवले, तर राजकारणात चुकीचा पायंडा पाडणाऱ्यांचे पाऊल चुकीचे पडणार नाही.
तत्कालीन पुणे नगरपालिकेचे सभासद म्हणून महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले यांनी काम केले आहे. साहित्यसम्राट न. चिं. केळकर, ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे, नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे सभासद होते. १९२० पूर्वी या महान व्यक्तींनी पुणे नगरपालिकेत नेतृत्व केले आहे. १९२० नंतर काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे यांसारख्या थोर नेत्यांनी पुणे नगरपालिकेचे सभासद म्हणून काम पाहिले आहे.
|
|
लोकमान्य टिळक हे १८९५ साली पुणे नगरपालिकेमध्ये पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते. गोपाळ कृष्ण गोखले हे १९०४ आणि १९०५ मध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष होते. हरिभाऊ आपटे हे १९१८ मध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष होते. पुण्याच्या राजकारणावर महात्मा फुले यांची सामाजिक चळवळ, लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रीय जहाल राजकारण आणि १९२० नंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनाचा प्रभाव होता. काकासाहेब गाडगीळ हे १९२८ ते १९३२ या काळात पुणे नगरपालिकेचे सभासद होते. १९३८ मध्ये काँग्रेस पक्षाने पुणे नगरपालिकेची निवडणूक लढविली, तेव्हा आचार्य अत्रे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे नगरपालिकेची निवडणूक लढविली होती. ते तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्षही होते.
गोपाळ कृष्ण गोखले हे नगरपालिकेचे अध्यक्ष असताना १९०५ मध्ये त्यांना एक महिन्यासाठी इंग्लंडला जायचे होते. या काळात त्यांना अध्यक्षपदाचे काम पाहता येणार नव्हते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हे उदाहरण सध्याच्या राजकारण्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारे आहे. राजकारणात नैतिक मूल्यांची जपणूक कशी करण्यात येत होती, याचा हा दाखला म्हणावा लागेल.
स्वातंत्र्यपूर्व काळातील पुण्याच्या राजकारणातील या महान व्यक्तींनी पुण्याच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम केले. राजकारणात नैतिकता असते. नैतिकतेची पातळी सोडून राजकारण करायचे नसते, याचा त्यांनी वस्तुपाठ घालून दिला होता. सद्याच्या परिस्थितीत राजकीय पक्ष, नेते आणि उमेदवार यांनी राजकारणाचा खेळखंडोबा केला असताना या महान समाजसेवक, राजकारणींचे स्मरण ठेवले, तर निवडणुका या लोकशाहीचा उत्सव असल्याचे मतदारांना वाटेल आणि राजकारणाची पातळी घसरणार नाही.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




