
Pune : कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष आणि त्यामध्ये प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असतात. विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य वाढविण्यासाठी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष ताकद पणाला लावत असतात. त्यासाठी महापालिका निवडणूक एक सदस्य वॉर्ड पद्धतीने घ्यायची, की बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने, हा कायम वादाचा विषय राहिला आहे. एक सदस्यीय वॉर्ड पद्धत कायम काँग्रेसला फायदेशीर राहिली. त्यामुळे काँग्रेसचा अट्टाहास याच पद्धतीने निवडणुका घेण्याकडे असतो. महाविकास आघाडीचे सरकार असताना तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिकांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय झाला. मात्र, महायुतीचे सरकार आल्यानंतर चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे ठरवण्यात आले. या वेळी महापालिकांच्या निवडणुका या विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहेत. त्यामुळे प्रभाग पद्धतीचा हा राजकीय खेळ कोणाला तारणार, हे आगामी विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
मतदारांशी जास्तीत जास्त संपर्क साधण्यावर राजकीय पक्षांचा भर असतो. एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीत कमी मतदार असल्याने स्थानिक प्रभावी उमेदवाराचा विजय सुकर होतो. मात्र, त्याच उमेदवाराला बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये विजयी होण्यासाठी धडपड करावी लागते. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष आपली स्थानिक पातळीवरील ताकद पाहून महापालिकांच्या निवडणुकांमध्ये कोणत्या पद्धतीने निवडणुका घ्यायच्या, हे ठरवत असतात. सत्ताधारी पक्ष तत्कालीन परिस्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेतो. कारण, महापालिकेच्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे यश मिळाले आहे, हे पाहून विधानसभा निवडणुकांमध्ये रणनीती ठरवणे सोपे होते.
|
|
पुणे महापालिकेच्या आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येक सत्ताधारी पक्षाने त्या- त्या वेळची परिस्थिती पाहून महापालिकेच्या निवडणुका या कधी एकसदस्यीय पद्धतीने, तर कधी बहुसदस्यीय पद्धतीने घेतलेल्या दिसून येतात. ४ मार्च १९५२ रोजी पुणे महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. पहिल्या निवडणुकीत ६५ नगरसेवक निवडून आले. २० बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने ही निवडणूक झाली. त्या वेळेच्या २ लाख ६,२६८ मतदारांनी ६५ नगरसेवक निवडून दिले. नंतरच्या निवडणुकांत प्रभाग पद्धत बदलली नाही. मात्र, मतदारसंख्येत वाढ झाली.
महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीत नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ झाली. त्या वेळी प्रभाग २० होते. मात्र, नगरसेवक ७३ निवडून आले. मतदारांची संख्या ३ लाख ४५,२५० झाली होती. महापालिकेच्या १९७४ मध्ये झालेल्या पाचव्या निवडणुकीनंतर बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा अवलंब करण्यात आला. नगरसेवकांची संख्या होती ७५. या निवडणुकीनंतर पुढील काही निवडणुका एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनेच घेण्यात आल्या. सहावी सार्वत्रिक निवडणूक १९७९ रोजी झाली. त्या वेळी ७५ नगरसेवक निवडून आले. १९८५ मध्ये सातवी सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या वेळी नगरसेवकांची संख्या ८५ होती. १९९२ मध्ये महानगरपालिकेची आठवी सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या वेळी नगरसेवकांची संख्या १११ झाली. हे सर्व नगरसेवक एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडून आले होते. १९९७ रोजी नगरसेवकांची संख्या १२४ झाली.
सन २००२ नंतर पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यास सुरुवात झाली. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ४१ प्रभागांतून १६२ नगरसेवक निवडून आले. त्यासाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यात आला. २०१९ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांनी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे महापालिकेत ५८ प्रभागांतून १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता आल्यानंतर तीन सदस्यांऐवजी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ४२ प्रभागांतून १६६ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.
सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून स्थानिक पातळीवर ही व्यूहरचना आखली जाते. या वेळच्या महापालिकेच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रभाग पद्धतीचा खेळ कोणाला तारणार, हे स्पष्ट होणार आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




