
Murlidhar mohol : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आज मुंबईतील शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, लोकसभा निवडणुकीत मनसेनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोहोळ यांनी राज ठाकरेंचे आभार मानले. राज ठाकरे यांना पुण्याबद्दल विशेष प्रेम आहे, लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी भविष्यातील पुणे कसं असावं यासंदर्भात जाहीर सभेत भाषण करुन काही अपेक्षाही नेतेमंडळींकडून व्यक्त केल्या होत्या. त्यामुळेच, निवडणूक निकालानंतर मुरलीधर मोहोळ यांनी आज राज ठाकरेंची भेट घेऊन पुण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मोहोळ यांच्याकडे असल्याने त्यांच्या खात्याविषयी चर्चा केली. राज ठाकरेंनी मला मार्गदर्शन केले, असे स्वत: मोहोळ यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या ठराविक उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यामध्ये, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे आणि पुणे या ठिकाणी सभा घेत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं होत. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरेंनी पुणे शहराचं वाढतं विस्तारीकरण आणि नागरी समस्यांवर भाष्य करताना पुणे शहराचं व्यवस्थित मॅनेजमेंट आणि सौंदर्यीकरण झालं पाहिजे, अशी भूमिका घेतली. आपल्या भाषणावेळी त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना जवळ बोलवून त्यांना विजयी करण्याचं आवाहनही पुणेकरांना केलं होतं. त्यानंतर, लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच खासदारकीची माळ गळ्यात पडलेल्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रातील मोदी 3.0 सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मोहोळ यांच्या रुपाने पुणेकरांनाकरांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालं आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आज मुरलीधर मोहोळ यांनी शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, अभिनेता रमेश परदेशी हाही सोबत होता.
|
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी घेतली अमित शहा यांची भेट, घरवापसीचा मुहूर्त ठरला? |
पिट्याभाईनेही वेधलं लक्ष
मुळशी पॅटर्नमध्ये पिट्या भाईची भूमिका साकार करणारे अभिनेते रमेश परदेशी हेही मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत राज ठाकरेंच्या भेटीला होते. त्यामुळे, फोटो फ्रेममध्ये पिट्याभाईनेही शिवतीर्थवरील राजभेटीत अनेकांचा लक्ष वेधले.
विधानसभेलाही हेच चित्र दिसेल
लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता, आता विधानसभेला अजून वेळ आहे. मात्र, विधानसभेतील महायुतीबाबत वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर चर्चा होईल, हे सर्व विषय त्यांच्याकडचे आहेत. असं असलं तरी विधानसभेलाही लोकसभेप्रमाणेच चित्र पाहायला मिळेल, असे म्हणत विधानसभेलाही मनसे महायुतीसोबतच राहिले, असे संकेत मोहोळ यांनी दिले आहेत.
पहिल्यांदाच खासदार अन् थेट मंत्री
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळाल्याने ही मोठी संधी मानली जाते. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवणे आणि मराठा समाजातील नेत्यास संधी देणे ही भूमिका ठेऊन पहिल्यांदा खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली आहेत. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची चांगली कामगिरी झाली. त्यामुळे त्या ठिकाणी भाजप भक्कम करण्याची जबाबदारी मोहोळ यांना करावी लागणार आहे. त्यामुळेच, भाजपने मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मोठी संधी दिल्याचे बोलले जाते.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!































Subscribe to my channel




