
Pune : शहरातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यातच हे खड्डे भर पावसात बुजविल्याने रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांत अनेक जणांना गंभीर दुखापत होत आहे. अशा रुग्णांची संख्या आठवडाभरात २० टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
शहरात पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडले. या खड्ड्यांत दुचाकी आदळून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रामुख्याने दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहे. त्यामुळे अनेकांना हाड मोडणे, मणक्याला दुखापत अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच पाऊस सुरू असताना खड्डे बुजविण्याची मलमपट्टी करण्यात आल्याने आता ते पुन्हा उखडले आहेत. त्यातील खडी रस्त्यावर पसरून दुचाकी घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे.
|
Pune : राज्यातील साडेचारशे जणांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस? आमदार बच्चू कडू यांच्याकडून शोध अभियान |
याबाबत ससून सर्वोपचार रुग्णालयात अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के म्हणाले, की रस्त्यावर दुचाकी अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने हाडांशी निगडित तक्रारी या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. कंबरदुखी आणि पाठदुखी असा त्रास या रुग्णांना होत आहे. अपघातात गुडघे आणि खांद्याला दुखापत होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा रुग्णांचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. अनेक वेळा गंभीर दुखापत असल्याने शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय राहत नाही. खड्ड्यांमध्ये बस आदळून मागील आसनावर बसलेल्या प्रवाशांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याच्याही काही घटना घडल्या आहेत.
या विषयी अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद मोडक म्हणाले, की रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून हाडे मोडणे, अस्थिबंध फाटणे असे प्रकार वाढले आहेत. याच वेळी मानदुखी, कंबरदुखी असा त्रास वाहनचालकांना होत आहे. रस्त्यावर दुचाकीवरून पडल्याने गुडघ्याला गंभीर इजा होण्याचे प्रमाण अधिक आहे. या आठवड्यात असे ५ ते ६ रुग्ण दाखल झाले आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खोलीचा अंदाज न आल्यानेही दुचाकी अपघात घडत आहेत. अशा प्रकरणांमध्ये कंबर आणि मणक्याला दणका बसल्याने गंभीर इजा होत आहे.
काळजी काय घ्यावी?
- खराब रस्त्यांवरून जाताना वाहनाचा वेग कमी ठेवा.
- रस्त्यावरील खड्ड्यांतून वाहन सावधगिरीने चालवा.
- गंभीर दुखापत टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे.
- रस्ते निसरडे झाल्याने वाहन चालविताना काळजी घ्यावी.
शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. रस्त्यावरील खड्डे वेळच्या वेळी बुजवायला हवेत. बांधकामाच्या ठिकाणची रेती आणि वाळू रस्त्यावर पसरत असून, ते टाळायला हवे. रस्ते चांगले असतील तर हे अपघात टाळता येतील.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!




























Subscribe to my channel




