
Nashik : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीतील काही कर्मचाऱ्यांवर अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर आरोप असलेले प्रकरण समोर आले असून, या प्रकरणात एका महिलेचा “मुख्य सूत्रधार” म्हणून सहभाग असल्याचा संशय एसआयटीने व्यक्त केला आहे. संशयित निदा खान ही गुन्हा नोंद होण्यापूर्वीच सावध झाल्याने पसार असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मूळ नाशिकची असलेली निदा खान हिने काही महिन्यांपूर्वी मुंबईत बदली करून घेतली होती. सध्या ती राज्यातील दाट लोकवस्तीच्या भागात लपून असल्याचा संशय असून, एसआयटीची दोन पथके तिचा शोध घेत आहेत.
या प्रकरणात नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आठ महिला आणि एक पुरुष फिर्यादी आहेत.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी सध्या नाशिकरोड कारागृहात आहेत.
तपास यंत्रणांच्या मते, निदा खान हिने कंपनीतील काही तरुणींशी ओळख करून देत इतर संशयितांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका बजावल्याचा संशय आहे. तिच्यासोबत आणखी एका तरुणीचा सहभाग असल्याचेही तपासात समोर आले असून, नंतर वाढलेल्या तणावामुळे ती व्यक्ती या गटापासून दूर झाल्याचे सांगितले जाते.
काही पीडित तरुणींना विशिष्ट धर्माचा पेहराव स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यात आल्याचे आणि त्यांच्यावर “धर्मसंस्कृती” लादण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व आरोप तपासाधीन असून, पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
दरम्यान, कंपनीने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना “आमचे शून्य सहिष्णुता धोरण असून, चौकशी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे” असे स्पष्ट केले आहे.
कंपनीतील सहाय्यक जनरल मॅनेजर (एजीएम) अश्निनी चैनानी हिला न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. तिची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज तिला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपासात तिने तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा तसेच काही कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक अतिरिक्त कामाचा ताण दिल्याचा आरोप समोर आला आहे.
एसआयटीकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील कारवाईचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेवर आणि चौकशीच्या निष्कर्षांवर अवलंबून राहणार आहे.
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



