ठाणे: वनहक्क, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी राज्यभरातून अत्यंत महत्त्वाचा असा 'संविधान हक्क संघर्ष मोर्चा' काढण्यात येणार आहे. भिवंडीजवळील दिवे येथून सुरू होणारा हा भव्य मोर्चा पालघर आणि ठाणेमार्गे थेट मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहे. या मोर्चामध्ये एक लाखांहून अधिक आदिवासी बांधव, शेतकरी, तरुण-तरुणी, पदाधिकारी आणि संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या विशाल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांची व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीत व्यापक बदल आणि नियंत्रण ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, या मोर्चामध्ये सहभागी होणारे लाखो लोक २७ ऑक्टोबरच्या रात्री ठाण्यातील खारेगाव टोल नाक्याजवळ मुक्काम करणार आहेत. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी हा मोर्चा मुंबईतील मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ होईल. एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या सहभागामुळे आणि मार्गावरील वाढती रहदारी लक्षात घेता, ठाणे शहर आणि परिसरातील वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांनी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध व नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात मुंबई, नवी मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना आनंदनगर चेक नाक्यावरून प्रवेशबंदी असणार आहे.
वाहतुकीसाठीचे पर्यायी मार्ग:
-
नाशिककडे जाणारी अवजड वाहने: मुंबई आणि नवी मुंबईतून नाशिककडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी आनंदनगर चेक नाक्याऐवजी ऐरोली, महापे, शिलफाटा, पत्रीपूल, दुर्गाडी आणि रांजणोली नाका या निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
घोडबंदरमार्गे जाणारी वाहने: मुंबई, विरार आणि वसईकडून घोडबंदरमार्गे नाशिकच्या दिशेने प्रवास करणाऱ्या जड वाहनांना लोढा यू-टर्नचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आला असून, त्यांनीदेखील आनंदनगर, ऐरोली-महापे, शिलफाटा, पत्रीपूल आणि रांजणोली नाक्याचा पर्यायी मार्ग वापरावा.
-
नवी मुंबई व पनवेल मार्ग: नवी मुंबई आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी आनंदनगर-ऐरोली मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.
मोर्चाच्या मार्गावर मोठी गर्दी जमण्याची शक्यता असल्याने ठाणे शहर पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel





The best spot to track and play on current events. Very intuitive layout and the community is great. Glad I found phpolymarket!