नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!

दुष्काळामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता; नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केली भीती | Saamana (सामना)नागपूर: उपराजधानी नागपूर शहराला गुन्हेगारीमुक्त आणि नशामुक्त बनवण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी मोठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणावर एमडी (MD) ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळ्या आणि भाड्याच्या घरात बनावट नोटा छापणारे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या संदर्भात नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीची माहिती दिली. पत्रकार परिषदेत बोलताना, "पोलीस आरोपी टप्प्यात आल्यावरच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतात," असे सूचक व आक्रमक विधान विश्वास नांगरे पाटील यांनी केले, ज्याची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

भाड्याच्या घरात सुरु होतं बनावट नोटांचं कारखानदारी नागपूरमधील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भाड्याच्या घरात बनावट नोटा छापल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे घरमालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ही मोठी कारवाई यशस्वी झाली. भाडेकरूने घरात आणलेले नोटा छापण्यासाठीचे विशिष्ट कागद आणि प्रिंटिंग साहित्य पाहिल्यानंतर संशय आल्याने घरमालकाने तात्काळ नागपूर पोलिसांशी संपर्क साधून गुप्त माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने छापा मारून छापा खाना उद्ध्वस्त केला आणि नोटा छापणाऱ्या आरोपींना मुसक्या आवळल्या.

ड्रग्ज सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार विशाल उर्फ फल्ली गुप्ता गजाआड याच मोहिमेदरम्यान, नागपूरच्या ड्रग्ज सिंडिकेटमधील मुख्य म्होरक्या असलेला आणि ज्याच्यावर तब्बल ४५ गंभीर गुन्हे दाखल आहेत असा कुख्यात गुन्हेगार विशाल उर्फ फल्ली गुप्ता याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. सुमारे १.५४ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या अटकेमुळे शहरातील ड्रग्जची पुरवठा साखळी खंडित होण्यास मोठी मदत होणार आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

'नशामुक्त नागपूर'साठी मकोकाअंतर्गत आक्रमक कारवाई नागपूर पोलिसांनी गेल्या चार आठवड्यांत तब्बल चार वेगवेगळ्या ड्रग्ज गँगवर अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (MCOCA) कडक कारवाई केली आहे. "नशामुक्त नागपूर"च्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे आणि ठोस पाऊल असल्याचे सांगताना पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, संघटित गुन्हेगारी आणि अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नाही. टप्प्यात आल्यावर पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करत त्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करतील, असा इशारा त्यांनी दिल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *