Tragic end for chilli trader: Brutally murdered by robbers while tracking stolen bike on Jafrabad-Warud Road.

चोरट्यांचा थरार! बुलेट शोधायला गेलेल्या मिरची व्यापाऱ्याची निर्घृण हत्या; जाफराबाद-वरूड रोडवर मध्यरात्री घडली घटना.

Tragic end for chilli trader: Brutally murdered by robbers while tracking stolen bike on Jafrabad-Warud Road.  
जाफराबाद (जालना):जाफराबाद-वरूड रोडवर चोरीला गेलेली आपली बुलेट शोधण्यासाठी गेलेल्या एका मिरची व्यापाऱ्याची चोरट्यांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात व्यापाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला आहे.

नेमके काय घडले?

शहरातील मिरची व्यापारी शेख मोहसीन शेख मजीद (वय ४७) यांची बुलेट चोरीला गेली होती. ही चोरी नेमकी कोणी केली आणि ती कुठे आहे, याचा शोध घेण्यासाठी मोहसीन हे आपल्या पुतण्यासह (शेख सोहेल) मध्यरात्रीच्या सुमारास जाफराबाद-वरूड रोडच्या दिशेने गेले होते. तिथे त्यांना काही संशयास्पद व्यक्ती आढळल्या. बुलेटचा शोध घेत असताना चोरट्यांनी अचानक त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.

सात वार, एक बळी:

हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे शेख मोहसीन यांच्यावर धारदार चाकूने तब्बल सात वार केले. या भीषण हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेत त्यांच्यासोबत असलेला पुतण्या शेख सोहेल हा देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जाफराबाद परिसरात खळबळ उडाली आहे



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *