
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जीमध्ये या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी सातच्या सुमारास एक भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत किमान 15 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून 20 हून अधिक कर्मचारी जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळी स्फोटाचा मोठा आवाज
राऊळगाव लगतच्या येनवरा गावाजवळ एसबीएल एनर्जीचा प्रकल्प असून येथे डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स आणि सिस्मिक एक्सप्लोजिव्ह्सचे उत्पादन केले जाते. याच प्रकल्पातील एका युनिटमध्ये सकाळच्या सुमारास अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की परिसरात मोठा आवाज घुमला आणि कारखान्याच्या काही भागांना आग लागली.
अनेक कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली
घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी विविध युनिटमध्ये 30 हून अधिक कामगार कार्यरत होते. स्फोटानंतर काही कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे आणि बचावकार्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींमध्ये बहुसंख्य महिला कामगारांचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.
सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांकडून कंपनीच्या सुरक्षितता उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कंपनीकडून सुरक्षिततेबाबत मोठे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही कामगारांना आवश्यक प्रशिक्षण न देता कामावर घेतले जात असल्याचाही आरोप पुढे आला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्फोटक साठवण किंवा उत्पादन प्रक्रियेदरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली असून तात्काळ मदत व बचावकार्य गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत आणि जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




