
Mumbai Rain : गेल्या ४ ते ५ दिवसांपासून राज्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मुंबईसह उपनगरातही पावसाची संततधार सुरूच असून सखल भागात पाणी शिरलं आहे. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबई लोकलला देखील बसला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून मुंबई आणि उपनगरातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. कुर्ला, चेंबूर, अंधेरी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवे देखील जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला ये जा करणाऱ्या वाहन चालकांना आणि नागरिकांना या ठिकाणाहून जाण्यास वाहतूक पोलिसांनी बंदी केली आहे.
|
|
सध्या पाऊस जरी थांबला असला तरी सबवेतील पाणी ओसरण्यास काहीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मुख्य रेल्वेमार्ग म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ कर्जत/ खोपोली तसेच हार्बर मार्ग (CSMT ते पनवेल- वाशी) ट्रान्स हार्बर (ठाणे- वाशी/पनवेल) तसेच बेलापूर- नेरळ- खारकोपर लाईन या चारही मार्गांवर ट्रेन सुरळीत सुरु आहेत. तर काही ठिकाणी लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या अपडेटनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे (चर्चगेट- डहाणू) व पश्चिम हार्बर (माहीम- गोरेगाव) या दोन्ही लाईनवरील ट्रेन नियमित वेळेनुसार धावत आहेत. प्रवाशांच्या माहितीनुसार काही स्थानकांमध्ये ट्रेन १० ते १५ मिनिट उशिराने धावत आहेत.
शहर
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल



























Subscribe to my channel




